अहमदनगर : केडगाव हत्याप्रकरणामधे काॅग्रेसचे नगरसेवक विशाल कोतकर यांना अटक करण्यात आली आहे. शिवसेना पदाधिकार्याच्या हत्या प्रकरणामधे विशाल कोतकर मुख्य सुत्रधार असल्याचा संशय सर्वत्र व्यक्त केला जात आहे. ७ एप्रिल रोजी केडगाव येथे शिवसेनेचे शहरउपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. केडगाव प्रकरणामधे आत्तापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आलेली आहे.
तत्पुर्वी गुरुवारी हत्याकांडाला कारणीभूत ठरलेल्या रवी खोल्लम याला नगर पोलिसांनी अटल केले होते. केडगाव पोटनिवडणूकीत संजय कोतकर व रवी खोल्लम यांच्यामधे मतदानाच्या कारणावरुन वाद झाला होता. खोल्लमला २૪ एप्रिलपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच या हत्याकांडप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, बी. एम. कोतकर, बाळासाहेब कोतकर यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मुख्य आरोपी संदीप गुंजाळ व बाबासाहेब केदार यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.