नवी दिल्ली | मोदी सरकारवर मांडण्यात येणाऱ्या अविश्वास ठरावावर शिवसेना मतदान करणार नाही असे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले आहे. शिवसेना ठरावाच्या बाजूने मतदान करणार नाही तसेच अविश्वास ठरावाच्या चर्चेला देखील उपस्थित राहणार नाही असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. एकंदर शिवसेनेची भूमिका भाजपाच्या बाजूनेच असल्याचे आपणास पाहण्यास मिळते आहे. तेलगू देसम पार्टीच्या वतीने मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत मतदान होणार आहे. मोदी सरकार वरील गेल्या चार वर्षातील पहिला अविश्वास ठराव आहे.
शिवसेना भाजपचा कट्टर मित्र राहिलेला पक्ष आहे परंतु नजीकच्या काळात दोघांमध्ये बेकी झाल्याने थोडे तिडी चे नाते निर्माण झाले आहे. जनते मधील रोष आपल्या बाजूने ठेवण्याचा हा शिवसेनेचा प्रयत्न आहे असे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे. आजच्या ठरावाचा काय निकाल लागणार या कडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.
#WATCH Anandrao Adsul, Lok Sabha MP from Shiv Sena on being asked whether his party will take part in #NoConfidenceMotion debate & voting says 'We are boycotting parliamentary work today and haven't even signed our attendance' pic.twitter.com/iHu3d2O7vu
— ANI (@ANI) July 20, 2018
https://platform.twitter.com/widgets.js
Shiv Sena Parliamentary party meeting continues in Parliament building. The MPs haven't reached Lok Sabha yet for discussion on #NoConfidenceMotion. pic.twitter.com/9hTFVFb5vg
— ANI (@ANI) July 20, 2018
https://platform.twitter.com/widgets.js