मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधी मंडळात निधीचा पुरवणी मागणी प्रस्ताव मांडला आहे. बुलेट ट्रेनला सतत विरोध करणारी शिवसेना या पुरवणी मागणीतील २५० कोटी खर्चाच्या मागणीच्या प्रस्तावर गप्प आहे. मात्र त्याचवेळी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी २५० कोटींच्या मागणीचे समर्थन केले आहे. यामुळे शिवसेनेच्या भुमिकेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.
‘आमचा बुलेट ट्रेनला विरोध आहे. सभागृहात हा विषय चर्चेला आल्यास आम्ही विरोध करू’ असे शिवसेना नेते अनिल परब याणी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले असूनसुद्धा केसकर यांनी अर्थमंत्र्यांच्या मागणीचे समर्थन केल्याने शिवसेना तोंडावर पडली आहे. यातून शिवसेनेचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
Home ताज्या बातम्या शिवसेनेची दुटप्पी भूमिका, बुलेट ट्रेनला विरोध पण २५० कोटींच्या पुरवणी मागणीला पाठींबा