बुलढाना : बँक अधिकार्याने पीक कर्जासाठी शेतकर्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कदायक प्रकार मलकापूर तालुक्यातील दातार गावामधे घडला होता. पीक कर्जासाठी अर्ज करण्याकरता सेंट्रल बँक आॅफ इंडीयाच्या शाखेत आलेल्या शेतकर्याच्या पत्नीकडे बँकेचे शाखाधिकारी राजेश हिवसे यांनी शरीरसुखाची मागणी केली होती. या घटनेचा समाजाच्या सर्व स्तरांतून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात होता. शेतकरी संघटनेने राजेश संबंधीत शाखाधिकार्याला तात्काळ निलंबित करावे अशी मागणी केली होती. काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा” असे म्हणुन शेतकर्यांवर अन्याय होत असल्याचे म्हणले होते. विविध पक्ष व संघटनांकडून संबधित अधिकार्याच्या निलंबनाची मागणी होत असल्याने अखेर राजेस हिवसे ला सेंट्रल बँक आॅफ इंडीयाने निलंबित केले आहे.