श्रीकर परदेशींची पीएमओच्या उपसचिव पदी बढती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून ओळख असलेले श्रीकर परदेशी यांची आज पीएमओच्या उप-सचिव पदी बढती झाली आहे. श्रीकर परदेशी २०१५ पासून पीएमओच्या संचालक पदावर काम पहात होते. परदेशी यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवत राष्ट्रीय राजधानीच्या प्रशासनात बढती मिळवली होती. त्यांच्या कार्य कौशल्याची दखल घेऊन त्यांना पीएमओच्या उपसचिव पदी बढती देण्यात आली आहे.
श्रीकर परदेशी हे पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असून त्यांनी त्या ठिकाणी एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. परदेशी हे २००१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांचे महाराष्ट्र केडर होते. लातूरचे जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. पिंपरी चिंचवडचे आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी अनधिकृत बांधकामावर केलेली कठोर कार्यवाही विशेष गाजली. त्यासाठी त्यांना धमक्या ही आल्या होत्य. परंतु परदेशी आपल्या निर्णयावर कायम राहिले. जनसामान्यांना कधीही उपलब्ध असणारे अधिकारी आणि कॉफी मुक्त अभियान राबणारे जिल्हाधिकारी म्हणून ते महाराष्ट्रात प्रसिद्ध होते.

Leave a Comment