श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे थाटामाटात आगमन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 टीम, HELLO महाराष्ट्र | पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचे काल थाटामाटात आगमन झाले. शिर्डी कोकमठाण येथील विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली. मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी ७ वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला.

यावेळी सकाळी 8:30 वाजता मुख्य मंदिरापासून शेषात्मज रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढली गेली. फुलांनी साकारलेले २१ नागरथावर लावण्यात आले. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक काढण्यात आली.

देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बॅण्ड, प्रभात बॅण्ड, मयूर बॅण्ड आणि ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग होता. दुपारी १२ वाजून २० मिनीटांपर्यंत प्राणप्रतिष्ठापना केली केली गेली.

यंदाची सजावट असलेले श्री गणेश सूर्यमंदिर हे ओदिशा राज्यातील जगप्रसिद्ध कोणार्कच्या सूर्यमंदिरावर आधारित असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment