हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही वर्षांपूर्वी अचानक जगभरात ब्लु व्हेल हा गेम चर्चेत आला होता. या गेममुळे जगभरातील अनेक देशातील लोकांनी आपले जीव गमावले होते. या गेमची सुरुवात रुस पासून झाली होती. यानंतर जगासोबत तो भारतातही पसरला होता. यानंतर अनेक आत्महत्येची प्रकरणे समोर आली होती. यानंतर या गेमवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर जगभरात पब्जी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला आणि लोक ब्लु व्हेल ला विसरून गेले. पण संचारबंदीत पुन्हा मुलांच्या मोबाईल मध्ये ब्लु व्हेल हा गेम आला आहे. रुसच्या पोलिसांनी याबाबत पालकांसाठी इशारा जारी केला आहे. त्यांनी पालकांना आपल्या मुलांवर लक्ष द्यायला सांगितले आहे.
संचारबंदीमध्ये ऑनलाईन क्लाससाठी मुलांच्या हातात पुन्हा एकदा मोबाईल आला आहे. यामध्ये खूप सहज मुलांच्या हातात या गेमचा ऍक्सेस येतो. २०१६ मध्ये रुस मध्ये आलेल्या या गेमने वेगात जगभरात बस्तान बसविले होते. यामध्ये भारतदेखील होता. या गेमच्या शेवटी लोक आत्महत्या करण्यासाठी असहाय्य होऊन जातात. या गेमला साधारण ५० दिवस खेळले जाते. ५० दिवस खेळणाऱ्यांना ५० चॅलेंज पूर्ण करायला सांगितले जाते. सुरुवातीला सोपे चॅलेंज असतात. यामध्ये हॉरर सिनेमा बघण्यापासून ते रात्री विचित्र वेळी जागरण अथवा झोप यांचाही समावेश आहे. हळूहळू चॅलेंजची पातळी वाढत जाते. ५० व्या दिवसापर्यंत खेळणारे खेळाच्या इतक्या आहारी जातात की काहीही करायला तयार होतात. अशामध्ये चॅलेंज देणारा त्यांना आत्महत्या करण्यास उद्युक्त करतो.
असे सांगितले जाते की, गेमचा इंस्ट्रुक्टर विदुषकाच्या वेशात असतो. तो मुलांना इंस्ट्रुक्शन देतो. अगोदर प्रेमाने नंतर ब्लॅकमेल केले जाते. रशियन पोलिसांनी हा गेम परत खेळला जात असल्याचे सांगितले आहे. म्हणूनच संचारबंदीत मुलांना मोबाईल देऊन बेपर्वा न होता त्यांच्याकडे लक्ष देणेदेखील गरजेचे आहे. हा गेम खेळणारी मुले स्वतःलाच त्रास देतात. यामध्ये मुले नस कापून घेतात. कोरोनामुळे शाळा कॉलेज बंद आहेत अशात मुले ऑनलाईन क्लास करत आहेत. ज्यामुळे त्यांच्याकडे मोबाईल दिले जात आहेत. त्यामुळे पुन्हा गेम पसरला तर मोठ्या संख्येने मुलांना नुकसान होईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.