हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कोरोनाच्या काळात सर्व स्तरावर संकट आले आहे. अनेक लोक देशात आहेत कि त्यांनी आपले सामाजिक जबादारी ओळखून मदतीचा हात पुढे केला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या काळात पश्चिम बंगाल मध्ये एक लग्न झाले पण सप्तपदीनंतर ते नवरा नवरी घरी ना जाता डायरेक्ट ते पोलीस स्टेशनला आले. त्या दांपत्यांनी पोलीस स्टेशनला मदतीचा हात पुढे केला आहे.
कोरोनाच्या काळात अनेक जणांनी लग्न पुढे ढकलल तर काहींनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अश्याच एका लग्नाची कहाणी सोशल मीडियावर जोरदार पसरली आहे. नुकतेच लग्न झालेले एक जोडी पोलीस स्टेशन मध्ये येताना पाहून सारे पोलीस अवाक झाले. त्यांच्या मनामध्ये अनेक विचारांचे काहूर माजले . पोलिसांनी त्या दोघांना पोलीस स्टेशन मध्ये येण्याचं कारण विचारलं त्यानुसार त्याच्या नवीन आयुष्याला सुरुवात करण्यापूर्वी कोरोनाच्या काळात मदत करणारे आणि कोरोना योद्धा असणाऱ्या पोलिसांचा आशीर्वाद घेण्यासाटी ते दोघे आले होते.
कोरोनाच्या काळात पोलीस कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहेत. सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होतंच आहे. पण या नवीन दांपत्यांनी कोरोना वोरीयर्स ना मदत करत त्यांचे आशीर्वाद घेतले. पश्चिम बंगाल मधील हिजलक या गावातील हे दोघे तरुण आहेत. अनिश माझी असं या तरुणाचं नाव आहे. त्याने संगीता या मुलीसोबत लग्न केलं आहे. पोलिसांचे आशीर्वाद घेण्यासाठी दाखल झालेल्या या दापंत्याच्या कामच कौतुक सोशल मीडियावर जास्त होत आहे.