मुंबई : ‘मी तुला बघून घेईन’ अशी धमकी देत चंद्रकांतदादा अक्षरश; माझ्या अंगावर धावून आले. हा गुंडागर्दीचा प्रकार चक्क विधानपरिषदेमधेच घडला असून प्रशांत परिचारक यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर मी सभागृहात प्रश्न विचारल्यानेच माझ्यावर अशा प्रकारे हल्ला झाला आहे असा गंभीर आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला आहे.
प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी विधानपरिषदेत मोठा गोंधळ झाला. प्रशांत परिचारक यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यामुळेच चंद्रकांतदादा आपल्या अंगावर धावून आले असल्याचे कपिल पाटील यांचे म्हणणे आहे.
“तुला बघून घेतो, बदडून काढतो”, अशी धमकी राज्याचे महसूलमंत्री देत असतील, तर परिस्थिती गंभीर आहे.”, असे मत कपिल पाटील यांनी व्यक्त केले. प्रशांत परिचारकरांनी जो शब्दप्रयोग केला, ती परंपरा या सरकारला मान्य आहे काय? हा माझा प्रश्न आहे. जर तसे नसेल तर त्याचा खुलासा सरकार का करत नाही?. सत्ताधारी पक्ष परिचारकांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे, विचारधारेचे समर्थन करते की नाही, हे सरकारने स्पष्ट करायला हवे. स्पष्टकरण देण्याऐवजी चंद्रकांतदादा सभागृहात ज्याप्रकारे भाषा वापरत होते, ती अतिशय निकृष्टदर्जाची होती आणि वेदनाजनक होती.” असे कपिल पाटील म्हणाले.https://youtu.be/gpFCAc49m6c