दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज समलिंगी प्रकरणावर सुनावणी सुरु झाली आहे.समलिंगी संबंधांना बेकायदेशीर ठरवणारे भारतीय दंड संहितेचे कलम ३७७ रद्द करण्यात यावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या गेलेल्या दोन खटल्यांवर आज सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी झाली. याचिकाकर्त्याच्या वतीने आज बाजू मांडण्यात आली. अरविंद दातार यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडली. तर सरकारच्या बाजूने तुषार मेहता यांनी बाजू मांडली.
आज आणि उद्या सलग दोन दिवस खटल्याची सुनावणी चालणार आहे.या खटल्याची सुनावणी एक महिन्या नंतर घ्यावी अशी मागणी सरकारच्या वतीने करण्यात आली परंतु न्यायालयाने सुनावणी पुढे ढकळण्यास नकार दिला