दिल्ली | कॉग्रेसचे खासदार के. ए. वेणूगोपाल यांनी शून्य प्रहरात मॉब लिंचिक या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यावर सरकारने मत मांडावे म्हणून त्यांनी आग्रह धरला. शून्य प्रहर असल्याने गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संशिक्ष स्वरूपात उत्तर दिले.
‘मॉब लिंचिंग हा विषय राज्यांच्या कार्यक्षेत्रातील आहे. तरीही आमचे सरकार या विषयावर गंभीर आहे. आम्ही राज्यांना याविषयी गांभीर्य बाळगण्याचा सल्ला दिला आहे’ असे राजनाथ सिंह उत्तर देतेवेळी म्हणाले. कॉग्रेसच्या खासदारांनी या मुद्दयावर गदारोळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु सभापती सुमित्रा महाजन यांनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्यानंतर कॉग्रेस सदस्यांनी सभात्याग केला.