सांगली | भाजपाने कॉग्रेस आघाडीला घाम फोडल्याचे चित्र सांगली महानगरपालिका निवडणुकीतून दिसून येत आहे. सांगली पालिका निवडणुकीत भाजपाने अनपेक्षित पणे मुसंडी घेतली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहीतीनुसार भाजप ४० जागी तर कॉग्रेस आघाडी २० जागी आघाडीवर आहे. तर इतर २ जागी अपक्ष आघाडी वर आहे.
वसंतदादांची सांगली अशी सांगलीची ओळख असताना सांगली आता भाजपमय झाल्याचे बघून बऱ्याच जणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सकाळी निकालाचे कल आले तेव्हा कॉग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी पुढे चालत होती. परंतु आता दुपार नंतर भाजप पुढे चालल्याने बरेच लोक आवाक झाले आहेत. भाजपने बाहेरील पक्षातून उमेदवार आयात करून ही निवडणूक लढवली आहे. त्यामुळे भाजप अशा आश्चर्यकारक विजया पर्यंत पोहचले असल्याचे सामान्यातून बोलले जात आहे.