साईबाबांच्या जन्मभूमीचा वाद पेटला; जन्मभूमीच्या विकासासाठी घोषित झालेला निधी पाथरीला की शिर्डीला?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी, गजानन घुंबरे : महाराष्ट्र शासनाकडून साईजन्मभूमीच्या विकासासाठी शंभर कोटींच्या निधीची घोषणा झाल्यावर साईजन्मभूमी म्हणुन पाथरीच्या विकासाला शिर्डीवासीयांनी विरोध दर्शविला आहे. पाथरीकरांनी मात्र जन्मभूमी असल्याबद्दल आमच्याकडे पुरावे आहेत यावर वाद नको म्हणत सामंजस्याची भूमिका घेतली आहे. या संदर्भात पाथरीमध्ये आज ग्रामस्थ, विश्वस्त आणि कृतिसमितीने बैठक घेतली. यामध्ये साईबाबांच्या कर्मभूमी शिर्डी प्रमाणेच जन्मभूमी पाथरीचा विकास व्हावा अशी भूमिका घेण्यात आली.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मागील आठवड्यात औरंगाबाद येथे विभागीय बैठकीत साईबाबा जन्मभूमीच्या विकासासाठी शंभर कोटी निधी देण्याची घोषणा करताच नव्याने वाद सुरू झालायं. यामध्ये साई मंदीराचा विकास व्हावा परंतु पाथरी शहर साईजन्मभूमी म्हणुन विकसीत करण्याबाबत शिर्डीवासीयांनी विरोधाची भूमिका घेतली असल्याच्या मुद्द्यावर आज पाथरी शहरातील साईभक्त व विश्वस्त यांनी बैठक घेतली.

यावेळी विश्वस्त व कृतीसमिती अध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांनी शिर्डीकरांना आम्ही साईबाबांचा जन्म पाथरीत झाला याचे पुरावे देऊ, शिर्डी करांनी साईबाबा पाथरी जन्मले नसतील असे पुरावे द्यावेत, साईबाबा जन्मभूमी पाथरीचा विकास झाल्याने शिर्डीचे महत्त्व कमी होणार नसून पाथरीत येणाऱ्या भाविक भक्तांची सोय सुविधा यामध्ये या निधीतून उभारणी करण्यात येणार आहे त्यामुळे शिर्डी करांनी साईबाबांनी दिलेल्या श्रद्धा व सबुरी यांचा अंगीकार करत साईबाबा जन्मभूमी पाथरी विकासाला पाठिंबा द्यावा अशी अवेळी मागणी केली.

दरम्यान यावेळी साईबाबा जन्मभूमी समितीचे विश्वस्त संजय भुसारे यांनी साईबाबा पाथरीत जन्मले असल्याचे चे 29 पुरावे असून शिर्डीकरांनी जन्मस्थान नसल्याबद्दल एखादा तरी पुरावा द्यावा अशी मागणी केली.यावेळी आयोजित बैठकीला शहरातील विविध पक्षातील नेते, व्यापारी ,ग्रामस्थ व जिल्हाभरातून आलेल्या साईभक्तांची हजेरी होती.

साईबाबांच्या जन्मभूमीचा वाद नाही,विकास व्हावा; पाथरीकर ग्रामस्थांची मागणी

पहा व्हिडिओ– https://youtu.be/taweew85kok

 

Leave a Comment