सामन्यापूर्वीच दिल्लीला बसला मोठा धक्का ; ‘हा’ दिग्गज गोलंदाज जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा दुसरा सामना आज रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. परंतु या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे.दिल्लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा सराव सत्रात जखमी झाला आहे.दिल्ली साठी हा मोठा झटका आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इशांतच्या पाठीला दुखापत झाली आहे. यापूर्वीही त्याला अनेकदा दुखापत झाली होती. यावर्षी जानेवारीत इशांतला घोट्याला दुखापत झाली होती. एका महिन्यानंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत परतला, पण त्याच घोट्यात त्याला पुन्हा दुखापत झाली होती.

दिल्लीच्या संघात इशांतशिवाय हर्षल पटेल, मोहित शर्मा आणि आवेश खान हे भारतीय वेगवान गोलंदाज आहेत. इशांतच्या अनुपस्थितीत या तिघांपैकी एकाला आजचा सामना खेळायची संधी मिळू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’