सिंधुदुर्गातील कुडोपी येथील पुरातन कातळ शिल्पांच होणार संवर्धन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिंधुदुर्ग प्रतिनिधी । जिल्ह्यातील कुडोपी येथे आढळून आलेली कातळशिल्पे सुमारे १० एकर जागेत विस्तारलेली आहेत. या सर्वांचे अस्तित्व सुमारे इ. स. १० हजार वर्षापूर्वीपासून असल्याचे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. या कातळ शिल्पांचे संरक्षण करणे प्राथमिक गरज आहे. त्यामुळे ही शिल्पे संरक्षित करण्यासाठी पहिले पाऊल उचलले जाणार आहे. या करिता राज्य पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक झाली आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली.

याबाबत जिल्हा परिषदमध्ये राज्य पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांशी पराडकर यांची बैठक झाली. यात कुडोपी येथील कातळशिल्पे पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यावर चर्चा प्रामुख्याने झाली. यावेळी कातळशिल्पे पर्यटनदृष्ट्या विकसित झाल्यावर दाखल होणाऱ्या पर्यटकांकडून त्याला बाधा होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली. त्यामुळे प्रथम ही शिल्पे संरक्षित करण्याचा मुद्दा आला. त्यानुसार कोकण ग्रामीण पर्यटन योजनेतून यासाठी निधी उपलब्ध होईल का ? यावरही चर्चा झाली. त्यानुसार नियोजनचा प्रयत्न करण्याचा निर्णय झाला.

मालवण तालुक्‍यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळूण आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाश झोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. ही शिल्पे पर्यटनदृष्टया प्रसिद्धीस यावीत, याकरिता कातळ शिल्प ठिकाणी जाणारा रस्ता करण्यात येणार आहे. यासाठी नियोजनासाठी व धोरण ठरविण्यासाठी मालवण पंचायत समितीची सभा कुडोपी येथील कातळशिल्प ठिकाणी 1 जानेवारीला आयोजित केली होती. यावेळी पंचायत समिती सभेत त्यादृष्टीने नियोजन करण्याचे ठरले.

Leave a Comment