सेनेचे खासदार जाधव आणि भाजपा आमदार फड यांच्यात मनोमिलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

लोकसभा निवडणुकीत उघडपणे विरोधात काम केल्याने पाथरीचे आ. मोहन फडांवर कमालीचे नाराज झालेले परभणीचे खासदार संजय जाधव यांनी याचा वचपा विधानसभा निवडणुकीत काढणार असा इरादा कार्यकर्ता मेळाव्यात बोलून दाखवला होता. या जाहीर वक्तव्याला काही दिवस झाले नसुन आज दोघांत मनोमिलन बैठक झाल्याने खासदारांनी काढलेली तलवार खरचं म्यान केली काय असा प्रश्न सेनेच्या कार्यकर्त्यांना पडलाय .

लोकसभा निवडणुकीत पाथरी विधानसभा मतदारसंघात आ . मोहन फड़ यानी आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा जाहीर प्रचार केला होता .2014 अपक्ष निवडूण आल्यावर फड यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता . यावेळी खा . संजय जाधव यांच्याशी त्यांचे मतभेद व मनभेद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडत भाजपात प्रवेश केला होता .आ .मोहन फड़ यांनी लोकसभा निवडणुकीत युति धर्म न पाळता आघाडी च्या उमेदवाराचा प्रचार करत , पाथरी विधानसभा मतदार संघातुन सेनेची लिड कमी केली. यावेळी खासदार जाधव निवडूण आल्यावर कमालीचे नाराज होते. पाथरी विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या कोट्यात असुनही आता मुख्यमंत्र्यांच्या वरदहस्तांने आ. फड यांनी ती भाजपाला सोडवून घेतलीय.

आज आमदार मोहन फड़ यानी खासदार संजय जाधव याची भेट घेतली. खासदार संजय जाधव यांनी ही उमेदवारी मिळाल्या बद्दल पेडा भरवत आमदांरांच्या सत्कार केला असुन “आम्ही महायुती धर्म पाळणार,पुर्ण ताकदीने काम करु ” असा शब्द दिलाय. आता खासदारांनी शिवसैनिकांना मेळाव्यात दिलेला शब्द ते पाळतात का ? अथवा आ . फड़ांना दिलेला शब्द पाळतात हे प्रचारादरम्यान उघड होणार आहे .

Leave a Comment