सैराटचा रिमेक धडक आज होणार रिमिक

thumbnail 1532064476180
thumbnail 1532064476180
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई| सैराटचा रिमेक असलेला धडक हा बहुप्रतिक्षित चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्रीदेवींची छोटी मुलगी जानवी कपूर धडकमधे अर्चीच्या भूमिकेत दिसणार आहे तर या चित्रपटाला अजय अतुल यांचे संगीत असणार आहे. करण जोहरच्या चित्रपट प्रोडक्शन कंपनीत तयार झालेला हा चित्रपट आहे. मागे चित्रपटाच्या गण्यावरून मराठी सोशल मीडियावर तुफान टिका झालेला चित्रपट लोकांच्या पसंतीला किती उतरतो हे पाहण्यासारखे आहे.
सैराट हा मराठी माणसाच्या मनावर राज्य केलेला चित्रपट आहे.त्याचा रिमेक हा महाराष्ट्रात बहुप्रतिक्षेचा ठरला होता तो आज प्रसिद्ध होतो आहे.परशा आणि अर्ची हा घरा घरातील चर्चेचा विषय होऊन गेली होती एवढा हा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला होता.धडक हा हिंदीतील चित्रपट लोकांच्या प्रसिद्धीस किती उतरतो हे पाहण्यासारखे असणार आहे.
दरम्यान पत्रकारांच्यासाठी दाखण्यात आलेल्या धडकच्या प्रेस शो ला गेलेल्या पत्रकारांनी धडकचे निकालपत्र ‘सुमार चित्रपट’ असे टिपले आहे. नागपूर,कोलकत्ता, राजस्थान तीन राज्यात चित्रित झालेला चित्रपट दृश्यतील वैविध्य दाखवण्यात अपयशी ठरला आहे असे मत प्रेस शो बघितलेल्या पत्रकारांनी व्यक्त केला आहे .