सोलापुरात दोन पोलिसांना लाच घेतांना रंगेहात पकडले, गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापुर प्रतिनिधी। सोलापुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन पोलिसांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. विभागाला मिळालेल्या माहितीनुसार विभागातील अधिकाऱ्यांनी सापळा रचत संबंधित दोघा पोलिसांवर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

संतोष राठोड आणि महेश दराडे अशी रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. या दोन लाचखोर पोलीसांवर 5 हजाराची लाचेची मागणी तसेच 3 हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांच्यावर आरोप ठेवत कारवाई केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अजितकुमार जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील दोघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीसांनी ही लाच मागितली असल्याची माहिती समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment