सोलापूर जिल्ह्यात कॅनॉल फुटल्याने ४०० एकर शेतजमीन पाण्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी। उजनी धरणाच्या डाव्या कालव्याच्या मोहोळ शाखेवरील सय्यद वरवडे येथील काळे वस्तीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास कॅनॉल फुटल्याने सुमारे ४०० एकर शेतजमिनीमध्ये कॅनालचे पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याची घटना मोहोळ तालुक्यात घडली आहे.

उजनी धरणातील पाणी पातळी वाढल्यामुळे अतिरिक्त पाणी नदी आणि कालव्यामार्फत सोडले जात आहे. उजनीच्या सय्यद वरवडे गावाजवळून वाहणाऱ्या मोहोळ शाखा किलोमीटर तिसरा सय्यद वरवडे येथील डाव्या कालव्याच्या भरावाची माती खचल्यामुळे मागील दोन दिवसापासुन या ठिकाणाहुन पाणी झिरपणे सुरूच होते. गुरुवारी मध्यरात्री हळूहळू पाझरत असलेल्या पाण्याच्या अधिक दाबामुळे हा भाग खचला गेला आणि संपुर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी पसरले गेले. परिणामी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान  झाले आहे. यामध्ये   पाण्याचा जोर अधिक असल्याने  शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने भरल्या आहेत.  तसेच बांध फुटले  असून ऊस मका कांदा व अन्य पिके पाण्याखाली गेली आहेत.

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने रात्री २ .३० वाजता  जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता डी. बी .साळे , कार्यकारी अभियंता एन. व्ही. जोशी यांनी घटनास्थळी धाव घेत भेट देऊन पाहणी केली. या शाखेचे पाणी बंद करून कुरुल व बेगमपूर शाखेला सोडले आहे. याबाबत उपविभागिय अभियंता जिंतेद्र बंकापुरे यांनी  अशी माहिती दिली की ,’जलसंपदा विभागाचे मेकॅनिकल विभागा मार्फत मशिनरी द्वारे कालवा  दुरुस्ती चे सुरु करण्यात आले आहे.’

Leave a Comment