ज्युरिक/नवी दिल्ली : स्विस बँकेतील भारतीयांच्या पैस्यामधे ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंन्द्र मोदींनी राबवलेल्या काळा धन अभियानाल यामुळे मोठ्ठा धक्का बसला आहे. २०१७ या वर्षात स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवींमधे वाढ होऊन भारतीयांच्या एकुण ठेवींचा आकडा सात हजार कोटी इतका झाला आहे.
स्विस नॅशनल बँकेने सादर केलेल्या अहवालानुसार भारतीयांच्या ठेवींमधे २०१७ मधे ५० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. जगभरातील लोकांच्या एकुण ठेवींमधे तीन टक्क्यांनी वाढ झाली असून स्विस बँकेत १०० लाख कोटी रुपये असल्याचे अहवालात म्हणले आहे. पाकिस्तानी लोकांच्या ठेवींत २१ टक्क्यांची घट होऊनसुद्धा एकुण ठेवींमधे पाकिस्तान भारताच्या पुढे आहे. स्विस बँकेतील पाकिस्तानी लोकांच्या एकुण ठेवी ७,७०० कोटी असल्याचे समोर आले आहे.
मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर स्विस बँकेतील भारतीयांच्या पैस्यात वाढ झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.