औरंगाबाद प्रतिनिधी | मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या श्रीमंतांच्या मुलाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्यासोबत शारीरीकसंबंधांचे चोरून व्हिडीआहे क्लीप तयार करून त्या क्लीप द्वारे ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीतील दोन जणांना पुुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली. विश्वनाथ माळी (२२ रा. सिडको, एन-६), आणि कृष्णा नितीन क्षीरसागर (२१) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पुंडलिकनगर पोलिसांकडुन प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार आरोपी हा तरूण गारखेडा परिसरातील रहिवासी आहे. दोन वर्षांपूर्वी एका मॉल मध्ये त्याची एका तरूणीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. नंतर त्यांच्यात शारीरीक संबधक आले हाते. त्यांच्यातील शारीरीक संबंधीाची आरोपी तरूणीने अन्य साथीदाराच्या मदतीने चोरून क्लीप तयार केली होती. ही क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत तिने आणि तिचा साथी दार राजू शिवशंकर सहाणी (२२, रा. गजानन कॉलनी) यांनी त्यास ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. दोन वर्षांपासून ही ब्लॅकमेलींग सुरू होती.
ही क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यास वैवाहिक जीवनावर परीणाम होईल आणि समाजात बदनामी होईल् या भितीपोटी तक्रारदार यांनी आरोपी तरूणी आणि राजू सहानी यांना पाचा लाख रूपये दिले होते. ही रक्क्म घेतल्यानंतर पुढे आपला तक्रारदाराशी कुठलाही संबंध राहणार नाही असे बॉण्ड पेपर वर त्यांनी लिहून दिले होते. परंतु, पैशाचा उल्लेख त्यात केला नव्हता.
दरम्यान तक्रारदार यंचे वडील एका राजकीपय पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवत असल्याचे समजताच ११ ऑक्टोबर रोजी तक्रारदार तरूणी आणि तिच्या साथीदारंानी त्याना फोन करून तीन लाख रूपयांची मागणी केली. आरोपी तक्रारदार यांना पैसे घेऊन एमजीएम कॅम्पस परीसरातील अंधारात सुरक्षा रक्षकाच्या खेालीत पैसे ठेवण्याचे सांगितले.
तक्रारदार यांची आरोपींना खंडणी देण्याची तयारी नसल्याने त्यांनी पुंडलिक नगर पेलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, कर्मचारी रमेश सांगळे, विठ्ठल फरताळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रवीण मुळे, राजेश यदमळ, दिपक जाधव, जालिंदर मांटे, रवी जाधव, नितेश जाधाव, चालक अत्तार आणि विशेष पोलिस अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तेथे पैशाची बॅग ठेवल्यानंतर रात्री बारा वाजे दरम्यान कारमधून पैसे घेण्यासाठी आलेल्या दोन जाणांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यांची कार जप्त केली.