हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत बोलावली कार्यकर्त्यांची बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीला आणखी एक मोठा राजकीय हादरा बसणार असे संकेत मिळत आहेत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पूर्वीपासून निकटवर्तीय असलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपाच्या वाटेवर जाणार असल्याच्या हालचाली दिसून येत आहेत. हर्षवर्धन पाटलांनी आज बुधवार दि. ४ रोजी अकलूज येथे जाऊन विजयदादा यांची भेट घेतली.

या दोन्ही नेत्यांमध्ये बंद खोलीत तासभर चर्चा झाली. त्यांच्या बरोबर त्यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील हेही उपस्थित होते. त्यानंतर आजच निर्णय घेतो असे सांगून हर्षवर्धन पाटील बावड्याकडे रवाना झाले. श्री विजयसिंह मोहिते -पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादीला मोठे राजकीय धक्के मिळत आहेत. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील वजनदार राजकीय नेते हर्षवर्धन पाटील यांनाही भाजपमध्ये आणण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटलांची राजकीय खेळी यशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे. हर्षवर्धन पाटलांनी भाजप मध्ये जाण्यासाठी आज आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे.

Leave a Comment