हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यानंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूने आज आनंदाची बातमी दिली आहे. हार्दिक आणि नताशा यांना गुरुवारी पुत्ररत्न झाले होते. त्यानंतर आता भारताचा सलामीचा फलंदाज अभिनवर मुकंदला पुत्ररत्न झाले. अभिनव मुकंदने ट्विट करत आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
भारताचा क्रिकेटपटू अभिनव मुकुंदच्या घरी शनिवारी एक नवा पाहुणा आला आहे. मुकुंद आणि त्याची पत्नी आरभी या दाम्पत्याला पुत्ररत्न झाले आहे. ही माहिती मुकुंदने ट्विटरवरर पोस्ट करून दिली. मुकुंद ट्विट करत म्हणाला की, ” माझी पत्नी आरभी आणि माझ्या आयुष्याला आज एक वेगळे वळण मिळाले आहे. एक पालक म्हणून आमचा प्रवास आजपासून सुरु होत आहे. आज सकाळी आमच्या घरात पुत्ररत्न जन्माला आले आहे.”
मूळचा तामिळनाडूचा फलंदाज असलेल्या अभिनव मुकुंदने भारताकडून सात कसोटी सामने खेळले आहेत. २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी संघातून पदार्पण केलं होतं. ७ सामन्यांत मुकुंदने ३२१ धावा केल्या. तामिळनाडूकडून प्रथम श्रेमी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १४५ सामन्यांत १०२५८ धावा आहेत. त्याच्या नावावर तिहेरी शतकही आहे. आयपीएलमध्ये अभिनव मुकुंद पंजाब संघाकडून खेळतो.