विसनगर (गुजरात) | पाटीदार समाजाच्या आरक्षणाची मागणी करत जनआंदोलन उभा करणारा हार्दिक पटेल दंगल भडकवणे या प्रकरणात गुन्हेगार ठरला आहे. २०१५ साली केलेल्या आंदोलना दरम्यान मेहसाणा विसनगर येथे दंगल उसळली होती. त्यावेळी भाजपचे आमदार ऋषिकेष पटेल यांच्या संपर्क कार्यालयाची जाळफोळ करण्यात आली होती. याचाच खटला विसनगर कोर्टात सुरू होता. विसनगर कोर्टाने हार्दिक पटेल यास दोन वर्षाचा करावासासहित ५० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.
पाटीदार समाजाला राज्याच्या कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले होते. आंदोलन हिंसक झाल्याने वित्तीय नुसकान झाले होते. पाटीदार समाजाचा नेता असलेल्या हार्दिक पटेलला भाजपा दबावात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही हार्दिक नेहमी सत्ताधारी भाजपवर टीका करत असतो. सदर खटल्यातील अन्य १४ आरोपींना पुराव्या अभावी मुक्त करत असल्याचे न्यायालयाने घोषित केले तर लजित पटेल आणि ए.के.पटेल यांना हार्दिक पटेल यांच्या समवेत न्यायालयाने दोषी ठरवले आहे.