दरमहा 12,388 रुपयांची पेन्शन मिळवण्यासाठी LIC च्या ‘या’ योजनेमध्ये करा गुंतवणूक !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव लाईफ इन्शुरन्स कंपनी असलेल्या LIC च्या 2000 पेक्षा जास्त शाखा आणि 14 लाखांहून अधिक एजंट आहेत. LIC मध्ये कोट्यवधी भारतीयांनी गुंतवणुक केली आहे. गुंतवणूकीची सुरक्षितता आणि त्यावर दिला जाणारा चांगला रिटर्नमुळे कंपनी देशात खूपच लोकप्रिय आहे.

वयाच्या 60 नंतर पेन्शन देणाऱ्या अनेक योजना आहेत, मात्र 40 व्या वर्षीच पेन्शन मिळू शकेल का??? तर याचे याचे उत्तर होय असे आहे. तर LIC कडून आपल्या ग्राहकांसाठी अशीच एक योजना चालवली जाते. जिचे नाव आहे एलआयसीची सरल पेन्शन योजना. या योजनेमध्ये वयाच्या 40 व्या वर्षापासून पेन्शन मिळू शकेल.

LIC Saral pension Yojana: हर महीने मिलेगी 12,000 रुपए पेंशन जानिए कवरेज,  एलिजबिलिटी और फायदे | Zee Business Hindi

एकरकमी गुंतवणूक

हे लक्षात घ्या कि, आयुष्यभर पेन्शन मिळवण्यासाठी एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. त्याच वेळी, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला गुंतवणुकीची रक्कम परत केली जाईल. यामध्ये जेवढी पेन्शन सुरु होते तेवढीच पेन्शन आयुष्यभर चालू राहते. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठीचे कमीत कमीत वय 40 वर्षे तर जास्तीत जास्त वय 80 वर्षे आहे. ही योजना एकट्याने किंवा पती-पत्नी दोघांनाही सोबत घेता येईल. तसेच एकदा ही पॉलिसी सुरू झाल्यानंतर पॉलिसीधारकाला 6 महिन्यांनंतर कधीही सरेंडर करता येईल.

LIC Pension Scheme: केवल एक बार प्रीमियम का भुगतान करने पर 12,000 रुपये की  पेंशन; जानिए इस खास एलआईसी प्लान के बारे में - Bihar Breaking News, बिहार  की ख़बरें, Latest ...

पेन्शन मिळवण्यासाठीचे चार पर्याय

LIC सरल पेन्शन प्लॅनमध्ये पेन्शन मिळवण्यासाठी एकूण चार पर्याय आहेत. यामध्ये ग्राहकाला मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिकरित्या पेन्शन घेता येईल. यामध्ये मासिक पेन्शन किमान 1000 रुपये, त्रैमासिक पेन्शन किमान 3,000 रुपये, सहामाही पेन्शन किमान 6,000 रुपये तर वार्षिक पेन्शन कमीत कमी 12,000 रुपये असेल. यामध्ये पेन्शनच्या जास्तीच्या रकमेबाबत कोणतीही मर्यादा नाही. उदाहरणार्थ, जर आपले वय 42 वर्ष असेल आणि आपण 30 लाख रुपयांची एन्युइटी खरेदी करत असाल तर मासिक पेन्शन म्हणून 12,388 रुपये मिळतील.

LIC Saral Pension Yojana | Plan No. 862 | Details In 2022

कर्जाची सुविधाही मिळेल

यामधील खास गोष्ट अशी कि, या योजनेमध्ये कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे. तसेच ही योजना सुरू झाल्याच्या सहा महिन्यांनंतर ग्राहकाला कर्जासाठी अर्ज करता येईल. त्याच वेळी, जर आपल्याला कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी पैशांची गरज असेल तर पॉलिसीमध्ये जमा केलेले पैसे देखील काढता येतील. मात्र एकदा पॉलिसी सरेंडर केल्यावर ग्राहकाला मूळ किंमतीच्या 95% रक्कम परत मिळेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Pension-Plans/LIC-s-Saral-Pension-PLan-No-862,-UIN-No-512N342V02

हे पण वाचा :

LIC Housing Finance चे होम लोन महागले, व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ !!!

Rakesh Jhunjhunwala यांच्या ट्रस्टची कमान राधाकिशन दमानी हाती !!!

Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ शेअर्सने दिले 30,000 टक्के रिटर्न !!!

चुकून डिलीट झालेले मेसेज रिकव्हर करण्यासाठी वापरा WhatsApp चे ‘हे’ नवीन फीचर !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन दर पहा