कराड- ढेबेवाडी मार्गावर दोन दुचाकीच्या अपघातात 1 ठार, 3 जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड- ढेबेवाडी मार्गावर असलेल्या विंग गावच्या हद्दीत लक्ष्मीकृपा मंगल कार्यालयासमोर दोन दुचाकींच्या अपघात झाला. यामध्ये एक ठार तर तीन जण जखमी झाले. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

विशाल राजेंद्र जाधव (वय- 23, रा. पोतले, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर शिवाजी निवास जाधव (वय- 24), अंजली शिवाजी जाधव (वय- 22, दोघेही रा. पोतले, ता. कराड) व अक्षय जालिंदर नलवडे (वय 26, रा. कोळे, ता. कराड) हे तिघेजण जखमी झाली आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विंग येथे कराड ढेबेवाडी रस्त्यावर लक्ष्मीकृपा मंगल कार्यालयासमोर सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या दुचाकीवरून रस्ता क्रॉस करत असताना दुसर्‍या दुचाकीने धडक देऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. तर तीन जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळतात पोलीस व स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी त्वरित रुग्णालयात हलवले. दरम्यान विशाल जाधव यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अपघातस्थळी पंचनामा करून पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहेत. रात्री उशिरापर्यंत कराड तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.

Leave a Comment