पुसेगाव येथे दुचाकी- एसटीच्या अपघातात 1 जण ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पुसेगाव (ता. खटाव) गावच्या हद्दीत एसटी व मोटारसायकच्या झालेल्या अपघातात एकजण ठार झाला आहे. दुचाकीस्वार सुरज जगताप (वय- 40, मुळगाव पांगरखेड, सध्या रा. पुसेगाव, ता. खटाव) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पब्लिक स्कूल गेटशेजारी पुसेगावच्या हद्दीत सेवागिरी पेट्रोल पंपाचे बाजूकडून पुसेगाव बाजूकडे जाणारी बजाज कंपनीची मोटरसायकल क्रमांक (एमएच- 11- डीइ- 8747) ला पुसेगाव कडून दहिवडीकडे जाणाऱ्या एसटीला क्रमांक (एमएच- 07- सी- 9093) धडकली. एसटीने चुकीच्या दिशेला जाऊन मोटरसायकलला धडक देऊन मोटर सायकलस्वार सुरज जगताप हा गंभीर जखमी झाला होता. जखमीस पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता, वैद्यकीय अधिकारी पुसेगाव यांनी मयत घोषित केले.

पोलीस स्टेशनच्या मिळालेल्या माहितीनुसार दि. 9/7/2022 रोजी रात्री 9 वाजून 55 मिनिटाचे सुमारास राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ पेट्रोल पंपाकडून पुसेगाव कडे मोटरसायकल वरून सुरज जगताप निघाला होता. एसटी चालकाने चुकीच्या दिशेला जावून दुचाकीस जोरात धडक देऊन त्यास गंभीर दुखापती व मरणास कारणीभूत ठरला. अपघातात मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. सदर या घटनेची पोलीस स्टेशनला नोंद झाली असून, पुढील तपास पुसेगाव पोलिस करत आहेत.

Leave a Comment