नवी दिल्ली । कोरोना महामारीपासून लोकांना विम्याचे महत्त्व समजण्यास सुरुवात झाली आहे. लोकं लाइफ, हेल्थ, मेडिकल इन्शुरन्सबद्दल जागरूक होत आहेत. मात्र कोरोना महामारीमुळे इन्शुरन्स महाग झाले आहे. अशी अनेक लोकं आहेत ज्यांना इच्छा असूनही इन्शुरन्स मिळवता येत नाही.
जी लोकं पैशांअभावी इन्शुरन्सचा लाभ घेऊ शकत नाहीत त्यांना मदत करण्यासाठी सरकार इन्शुरन्सच्या बाबतीत पुढे आले आहे. केंद्र सरकारने अत्यंत कमी प्रीमियमसह विमा योजना सुरू केल्या आहेत, ज्याच्या मदतीने अगदी कमी उत्पन्न असलेली व्यक्ती सुद्धा इन्शुरन्स कव्हर घेऊ शकतात.
सरकारच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) चा लाभ घेऊन एक सामान्य माणूस आपल्या कुटुंबाला सुरक्षित गॅरेंटी देऊ शकतो. येथे आम्ही या दोन योजनांची तपशीलवार चर्चा करीत आहोत-
पीएम सुरक्षा विमा योजना
सरकारने कोणत्याही बँकेत खातेदारांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे. या योजनेत तुम्ही वर्षाला फक्त 12 रुपयांच्या प्रीमियमवर 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण घेऊ शकता. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक प्रकारची ऍक्सिडेंटल इन्शुरन्स पॉलिसी आहे ज्या अंतर्गत अपघाताच्या वेळी मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विम्याच्या रकमेवर दावा करता येतो.
ही योजना 18 ते 70 वयोगटातील लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे बँक खाते आहे. या योजनेअंतर्गत विमाधारक व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यांना दोन लाख रुपये मिळतील. याशिवाय विमाधारकाच्या अपघातात दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय खराब झाले तर त्याला 2 लाख रुपये मिळतील. आंशिक अपंगत्व असल्यास 1 लाख रुपयांची विम्याची रक्कम दिली जाईल.
पीएम सुरक्षा विमा योजना प्रीमियम
PMSBY साठी, खातेदाराला वर्षाला फक्त 12 रुपये भरावे लागतील जे बँकेकडून थेट खात्यातून कापले जातील. यासाठी दरवर्षी 1 जूनपूर्वी फॉर्म भरले जातात. ज्या बँकेत तुमचे खाते आहे तेथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म सबमिट केल्यानंतर, बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम कापेल. जर तुमच्याकडे दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये दोन बचत खाती असतील आणि दोन्ही खाती प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेशी जोडलेली असतील तर विम्याची रक्कम फक्त एका खात्यावर चालू ठेवली जाईल. इतर खात्याने भरलेल्या प्रीमियमची रक्कम रोखली जाईल.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सामील होण्यासाठी, आपण पहिले आपले आधार कार्ड बँकेशी लिंक करणे आवश्यक आहे. यानंतर, दरवर्षी 1 जून पूर्वी एक फॉर्म भरून बँकेत द्यावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ शकता.
1 जून ते 31 मे पर्यंत विमा संरक्षण
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत इन्शुरन्स कव्हर फक्त 1 जून ते 31 मे पर्यंत उपलब्ध आहे. यासाठी तुमच्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. जर बँक खाते बंद झाले किंवा प्रीमियम कापण्याच्या वेळी खात्यात पुरेशी शिल्लक नसेल तर तुमचा विमा देखील रद्द होऊ शकतो.