सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 1 हजार 554 जण बाधित आढळले आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 29. 63 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण कायम असून ते वाढताना दिसत आहे.
गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 5 हजार 245 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 554 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 30 टक्क्यांजवळ आला आहे, काल पाॅझिटीव्ह रेट 33 टक्क्यांवर होता तो किचिंतसा खाली आला आहे.
शुक्रवारी दिवसभरात 1022 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 जणाचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांची टक्केवारी कमी करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. त्यामुळे पोलिसांकडून मास्कचे वापराबाबत उल्लघंन केल्यास पावती फाडून दंडाची रक्कम वसूल केली जात आहे.