कराड | श्री मळाईदेवी नागरी सह. पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 21 ऑगस्ट 2021 रोजी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त वेबिनारद्वारे आदर्श ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. संस्थेचे अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी संस्थेच्या प्रगतीचा व आधुनिक चालू वाटचाली संदर्भात मार्गदर्शन केले. संस्थेने 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात रक्कम रूपये 194 कोटी रूपयाचे व्यवसाय उदिष्ठ पुर्ण केले आहे. संस्थेस सन 2020-2021 या आर्थिक वर्षात रक्कम रू. 1 कोटी 67 लाखाचा ढोबळ नफा झालेला आहे. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने भविष्यातही संस्थेची क्षमता व स्थैर्य असेच भक्कम रहाणेसाठी संस्थेने एन. पी. ए. ची 100% तरतूद केलेली आहे. यावर्षी संस्था सभासदांना 10 टक्केे लाभांश देणार असल्याचे संस्थेच्या चेअरमन सौ. अरूणादेवी पाटील यांनी जाहीर केले आहे.
त्याचबरोबर सर्व शाखांमधून लॉकर सुविधा व सोने तारण सुविधा निर्माण करणेचा मानस चेअरमन यांनी व्यक्त केला. एन.पी. ए. प्रमाण अल्प आहे. संस्थेच्या 15 शाखा, मुख्य कार्यालय अशा 16 शाखामधून सर्व सामान्य नागरीकांना बॅकींग सुविधा उपलब्ध आहेत. सन 1987 साली सुरू झालेल्या संस्थेत आज अखेर 6 हजार 613 सभासद असून, दि. 31 मार्च 2021 अखेर संस्थेकडे 118 कोटी ठेवी आहेत. तसेच संस्थेने गरजू लोकांना 76 कोटी रूपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. तरलते पोटी संस्थेने विविध बँकामध्ये 55 कोटी रूपयांची मुदत ठेवीमध्ये गुंतवणुक केलेली आहे. तसेच संस्थेचे वसुल भाग भांडवल 8 कोटी असून, 6 कोटी रकमेचे राखीव व इतर निधी संस्थेने उभा केलेला आहे. संस्था सहकार कायदयाप्रमाणे कामकाज करून संस्था स्थापनेपासून सतत ‘अ’ वर्ग संपादन करत आहे. पतसंस्थेने अविरत जनसेवेची 34 वर्षे पुर्ण केलेली आहे. संस्थेकडे एकुण 65 कर्मचारी कार्यरत अाहेत, संस्थेच्या एकुण शाखापैकी 14 शाखा स्वःमालकीच्या इमारतीत आहेत.
एस.एन.थोरात, रोहित सावंत, दत्तात्रय यादव, शशिकांत ऐटांबे यांनी ऑनलाइन सभेचे नियोजन केले. सभेस शंकरराव डांगे, शामराव पवार, चंद्रकांत गायकवाड, सौ शारदा. वाघ,के.एल.सावंत, प्राचार्य एस.वाय.गाडे,शिरीष गोडबोले, शिवाजीराव धुमाळ आर आर पाटील यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव सर्जेराव शिंदे व अनिल पवार यांनी नोटीस वाचन केले. सूत्रसंचालन शर्मिला श्रीखंडे यांनी केले. आभार शोभा पाटील यांनी मानले.