जागतिकीकरणाला मुस्काटात मारत कोरोनाने संपूर्ण जगापुढे उभे केलेले १० प्रश्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Covid – १९ नंतरचे आपले आयुष्य मानवजातीच्या प्रचलित तत्वांच्या आयोजनाद्वारे विचारलेल्या प्रश्नांनी परिभाषित केले जाईल.  

वर्गिस के.जॉर्ज

लढा कोरोनाशी | शेवटच्या शतकामध्ये जे प्रश्न निराकरण मानले जात होते असे अनेक प्रश्न covid- १९ च्या साथीच्या आजारामुळे पुन्हा नव्याने उघडले  जात आहेत. हे आपल्या विवेकबुद्धीला पटणाऱ्या गेल्या शतकात तयार केल्या गेलेल्या आपल्या माहितीच्या जगाचे शेवटचे टोक आहे. covid -१९ नंतरचे आपले आयुष्य मानवजातीच्या प्रचलित तत्वांच्या आयोजनाद्वारे विचारलेल्या किमान १० प्रश्नांनी परिभाषित केले जाईल.

उपयुक्ततावादी प्रश्न – प्रथमतः या विषाणूने त्वरित जीवन आणि मृत्यूच्या परिस्थितीत अभिजात उपयुक्ततावादी प्रश्नांचे पुनरुत्थान केले आहे. पहिला प्रश्न अप्रत्यक्ष निवेदनात सादर करत असताना किंवा नसताना, किती जण आणि कोण या मोठ्या चांगल्यासाठी मृत्यू स्वीकारतील.? “मला माफ करा, काही लोक मरणार. आणि हेच आयुष्य आहे.” ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनरो यांनी हे जाहीर केले. ते म्हणाले, “आपण रस्त्यावरच्या ट्राफिकमुळे होणाऱ्या मृत्युंसाठी कारचे कारखाने बंद करू शकत नाही.” वयस्कर लोकसंख्या ही  समाजावरील ओझे आहे. ही आपली मानसिकता बऱ्याच काळापासून झाली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे खरोखरच एक प्रेरणा मिळेल. सर्वात योग्य तंदुरुस्त जगणाऱ्या लोकांची डार्विनच्या सामाजिक सिद्धांताची परीक्षा हाडांच्या इतक्या जवळून कधीच झाली नाही. ही  आकडेवारी केवळ विषाणूच्या विविध प्रतिसादाच्या सापेक्ष जाळ्याच्या उपयुक्तेतसाठी वादविवाद करण्यासाठी आहे.  केरळकडे एका वृद्ध जोडप्याचे जीवन वाचविण्यासाठी योग्य कारण होते का? सामाजिक आणि आर्थिक ध्येयामध्ये काय संतुलन आहे? 

दुसरा प्रश्न, आपल्याकडे राष्ट्रीय शक्ती काय आहे? “आपल्याकडे जसे युद्धाचे खेळ आहेत तशा आणखी जंतूंच्या खेळाची आपल्याला गरज आहे.” असे  काही वर्षांपूर्वी बिल गेट्स म्हणाले होते. अमेरिकेकडे प्रमुख सैन्य आहे. ती आर्थिक महासत्ता आहे. २६/११ पासून सातत्याने सैन्याच्या सामग्रीचे सामर्थ्य कमी होत आहे. पण त्यामुळे शस्त्रास्त्रांची जागतिक भूक कमी झाली नाही. जागतिक कंपन्यांना सामाजिक संपत्ती हस्तांतरित करून राष्ट्रीय शक्तीचा विस्तार केला जातो. हे करण्यासाठी जनतेच्या शक्तीचा चुकीचा वापर करण्याच्या राजकारणामुळे आपली मोठी हानी होते. शक्तीच्या विरोधाभासाचे विधान जागतिक आहे. विशेषतः भारत दयनीय स्थितीत आहे. हिंदुत्ववादी राष्ट्रवाद आणि सैन्यवादाचा उत्सव हे सामाजिक पायभूत सुविधांकडचे लक्ष कमी करण्यास अनुरूप आहेत. त्यांचा मध्यमवर्ग त्यांच्या अनिश्चित सैन्य पराक्रमाबद्दल बोलतो, पण त्यांच्या देशाच्या आरोग्यसुविधांच्या पायाभूत सुविधांचा नको असताना झालेला एन्काऊंटर त्यांच्या कल्पनाविश्वात व्यत्यय आणतो. आता शक्ती आणि सुरक्षिततेबद्दल नवी जाण येईल का?

तिसरा प्रश्न – जागतिकीकरण कुठे आहे? सर्व देशांनी विषाणूला थांबविण्यासाठी सीमा नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. ज्याने उपरोधिकपणे त्यांची व्यर्थता देखील दर्शविली. आपल्याला आता माहित असल्याप्रमाणे जगाच्या धोक्यात जागतिक सहकार्य आणि बहुराष्ट्रीय शासन बाहेर फेकले जाऊ शकते. हवामानबदल नेहमीच दूरवर दिसतो. हा मानवतेला अधिक गंभीर धोका आहे. आणि हा खूप निकडीचा धोका आहे. म्हणून प्रश्न आपल्याकडे कमी किंवा अधिक प्रमाणात जागतिकीकरण आहे का नाही याचा नसून त्यातील नैतिकतेचा आहे. ही निस्वार्थीपणे फायद्याची एक मोहीम आहे. आता एका नव्या जागतिकीकरणाची सुरुवात होईल, ज्यामध्ये मानवता आणि पर्यावरणाला प्राधान्य असेल.

चौथा प्रश्न, राज्ये किती मोठ्या प्रमाणात अधिक ऊर्जा साठवू शकतील? ९/११ ची सुरक्षा भीती, २००८ च्या आर्थिक संकटानंतर राज्यात आता स्थिर पुनरागमनाची सुरुवात झाली होती. साथीच्या रोगाचे खापर दैवी शक्तीवर फोडले जाऊ शकते. जे नियंत्रण आणि परोपकार नागरिक राज्याकडे शोधत असतात, आता त्यांना या उन्मादाची भीती वाटेल. आपण तंत्रज्ञानाचा देखरेखीसाठीचा कल्पनातीत उपयोग बघू.

पाचवा प्रश्न, ही विस्तारणारी अवस्था लोकशाही वाढविणारी असेल की, हुकूमशाही प्रबळ करणारी? चीन आणि सिंगापूरने हुकूमशाही उपाय काम करतात हे दाखवून दिले. जर्मनीने लोकशाही आणि सर्वसमावेशक पद्धतीसुद्धा काम करतात हे दाखवून दिले. पण इटली आणि यु.एसने दाखवून दिले की व्यक्तिवाद आणि बाजारपेठेमुळे सामूहिक उद्दिष्टांना अडथळा निर्माण होऊ शकतो. भारत ज्याने लोकशाही आणि हुकूमशाही असे संकरित उपाय तैनात केले आहेत. ती अजून खुली चाचणी आहे.
 
सहावा प्रश्न – कार्यक्षमता सुधारणाऱ्या आणि प्रगती आणणाऱ्या सर्व बेलगाम स्पर्धेच्या विरोधातील नवनिर्मितीच्या शहाणपणाचे काय होईल? न्यूयार्कच्या गव्हर्नर अँड्रयू काओमो यांनी दुःख व्यक्त करीत सांगितले, ” हा ते करण्याचा मार्ग नाही, मी इतर राज्यांशी स्पर्धा करीत आहे. त्यांच्याशी बोली लावत आहे.” ही  स्पर्धा नाही हे सार्वत्रिक आहे. इथे गरीब लोक एकमेकांना कमकुवत करत आहेत आणि श्रीमंत या नव्या उदार जगात स्वतःचा फायदा करून घेत आहेत. क्युबा हा देश ज्याला अकार्यक्षम मानले जाते त्यांनी बऱ्याच देशांना आरोग्य व्यावसायिक पाठवले. हा विषाणू आपल्याला सांगतो, ही स्पर्धा धोकादायक आहे. सहकार्यच आपल्याला यातून वाचण्यासाठी सक्षम करू शकते. याला काय पर्याय आहे? चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी १९ व्या कम्युनिस्ट पार्टी काँग्रेसच्या २०१७ च्या भाषणात  आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ च्या दावोसमधील मोगल भांडवलशाहीच्या भाषणात उदारमतवादी रूढीवाद हा उपाय परिभाषित केला होता.  संग्रहण हे नवीन जीवन आहे. इटलीने अलिटालियाचे राष्ट्रीयकरण केले तर स्पेनने सर्व रुग्णालयांचे राष्ट्रीयीकरण केले. कदाचित इतिहासाचा शेवट झाला नसेल.

सातवा प्रश्न, लोकवादाचे काय होईल? लोकवादी लोकांनी या संकटाला सामोरे जाताना उल्लेखनीय लवचिकता दाखविली आहे. अगदीच त्याच्या निराकरणाची गरज नाही, परंतु इतर देशांना, समूहांना आणि राजकीय विरोधकांना दोष देऊन ही  लवचिकता दाखविली आहे. सर्व लोकवाद्यांकडे या विषाणूची 
उत्परिवर्तित आवृत्ती असेल, ते त्यांचे आताचे अजेंडे प्रगत करण्यासाठी नवीन संदर्भ वापरतील. त्यांच्यापैकी त्यांच्या देशावर कोण घट्ट ताबा मिळवू शकेल? 

आठवा प्रश्न, साथीच्या आजाराने आणि निस्तेज झालेल्या लोकांकडून त्यांच्यापैकी कुणाला वाढलेल्या क्रोधाचा सामना करावा लागेल का? जागतिकीकरणाखाली कामगारांच्या अमानुष शोषणाला कार्यक्षमता आणि सपर्धात्मकतेचे नाव दिले गेले. जे जागतिकीकरणाच्या उपभोक्तावादी मोहाच्या भपकेबाजपणात लपवले गेले आहे. मेहनतीच्या दुकानातील अहवालानुसार विकसित देशांमध्ये कधीकधी कामगारांचे शोषण झाल्याचे शोधले गेले, पण या विषाणूमुळे हे मजूर या आयुष्यातून या लाजेच्या दिखाव्यातून बाहेर आलेत. दिवसाचे १६ तास काम करून  यु.एसमधील कामगार पगारी सुट्टी आणि आरोग्यसुविधा मिळवण्यासाठी सक्षम नाहीत. भारतातील स्थलांतरित कामगार घरी जाण्यासाठी कित्येक दिवस चालत आहेत. आणि पश्चिम आशियामध्ये कामगारांची वाईट पद्धतीने शिबिरे उभारली आहेत.

नववा प्रश्न असा आहे की, आपण जेवढा प्रवास करतो आहोत तितका प्रवास करण्याची गरज आहे का?  २०१९ च्या शेवटी जेव्हा या विषाणूची जागतिक दौऱ्यामध्ये नुकतीच सुरुवात झाली होती, काहीजण त्यांची सततचा विमानप्रवास स्थिर ठेवण्याशिवाय कोणत्याही चांगल्या कारणाशिवाय प्रवास करीत होते. ऑक्टोबरमध्ये यु.एसच्या हवामान बदलाच्या समितीने दिलेल्या अहवालामध्ये म्हटले होते, “जास्त प्रमाणात उड्डाणाला प्रोत्साहन देणाऱ्या सततच्या योजना बंद करून हवाई मार्गावर उड्डाणाला बंदी आणावी” उड्डाण न करण्याची उदयोन्मुख चळवळ अजून लक्ष वेधून घेण्यासाठी धडपडत होती, पण आता कदाचित तिच्याकडे लक्ष जाईल. डेमिलर/ मर्सिडीज बेन्झचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ओला कॅलेनियस यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, “आता ही डिजिटल साधने चांगल्या पद्धतीने काम करतात, हे माहित झाल्यामुळे आम्ही कदाचित काही व्यवसाय सहली वाचवू शकू.”  विशेषाधिकार असणाऱ्या लोकांचा प्रवास म्हणजे एक गचाळ अनुसरण असते, जेथे मोठ्या प्रमाणात सक्तीने लोकांचे स्थलांतर केले जाते.
 
दहावा प्रश्न हा आहे की, आपल्या सीमा आणि समुदायाच्या कल्पना कशा बदलल्या आहेत? covid- १९ ने विरोधाची शक्ती सैल केली आहे. एकीकडे प्रत्येकजण त्यांच्या छोट्या जागांमध्ये मर्यादित आहे आणि दुसरीकडे या संकटाने आपल्याला एकत्रित सामुदायिक क्रियेसाठी उद्युक्त केले आहे. नवउदारमतवादाने सर्व मानवी परस्परसंवाद व्यवहारात्मक केले होते. प्रत्येक व्यवहार स्वतंत्र असतो. अशा छोट्या संज्ञा सद्यस्थितीत आणि पुढच्या तिमाहीत खंड पाडतात. आताच्या पिढीपासून भविष्यात, हवामान बदलाच्या उपदेशाचा दृष्टिकोन बदलेल. माणुसकीच्या शाश्वत नियोजित तत्वाला स्वतःच्या आवडीने संकल्पनेची गरज भासेल, जे भौगोलिकरित्या किंवा वेळच्या गणितात त्वरित होणार नाही. जोखीम आणि बक्षिसे दोन्ही पसरण्यासाठी जास्त काळाची आणि आणि जागेच्या विस्ताराची आवश्यकता आहे. आणि हेच सर्वात मोठे आणि परिणामकारक आव्हान या साथीच्या आजाराने निर्माण केले आहे.

अनुवाद – जयश्री देसाई (9146041816)

Leave a Comment