जिल्ह्यातील 10 विद्यार्थी युक्रेनमधून पोलंड, रोमानिया सीमेवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – जिल्ह्यातुन वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले दहा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. त्यांनी युक्रेनमधून पोलंड, हंगेरी आणि रोमानियाची सीमा गाठली असून त्यातील काही जण विमानतळावर पोहोचले आहेत. येत्या दोन दिवसात ते आपल्या घरी पोहोचतील अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. एकाच कुटुंबातील चार सदस्य फुलं जवळील एक गावात थांबण्याची प्रशासनाने कळविले आहे. तसेच पैठण व औरंगाबादचे आणखी दोन विद्यार्थी असून ते सध्या सुरक्षितस्थळी असल्याचे प्रशासनाने सांगितले.

आठवड्यापासून रशिया युक्रेन मध्ये युद्धाची ठिणगी पडली असून, शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागलेला आहे. नोकरीनिमित्त गेलेले 4 आणि शिक्षणासाठी गेले 12 असे 16 जण युक्रेन मधून नजीकच्या देशांकडून सीमेवर पोहोचले आहेत. भूमिका शार्दुल, श्रुतिका चव्हाण, प्रतिक ठाकरे सोमवारपासून रोमानिया विमानतळावर आहेत. तसेच आकाश खैरनार आणि सचिन सिंग हे दोघे मंगळवारी रोमानिया दाखल झाले. निशा इंदुरे, अजिंक्य जाधव हेदेखील मंगळवारीच हंगेरी पोहोचले. पैठणची साक्षी चौधरी, औरंगाबादची अनुष्का शिंदे यांची नावे रात्री परराष्ट्र मंत्रालयाने जिल्हा प्रशासनाला कळवली.

जिल्ह्यातून 12 विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी आहे. तसेच एक सॉफ्टवेअर इंजिनियर पत्नी व दोन मुलांसह काही वर्षांपासून नोकरीनिमित्त युक्रेनमध्ये आहे. पैठण व औरंगाबाद येथील दोघे असल्याचे सायंकाळी परराष्ट्र खात्याने कळवले. मिशन गंगा मध्ये दहा जण होणार आहे. दोन दिवसात ते सर्वजण औरंगाबादला पोहोचतील. एका कुटुंबातील चार्ज नही सुरक्षित असल्याचे समजले आहे, असे जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी अजय चौधरी यांनी सांगितले.

Leave a Comment