10 वर्षांचे प्रेम !!! अवघ्या काही तासांचे लग्न अन् नंतर आत्महत्या, अशी आहे ‘या’ क्रूर हुकूमशहाची लव्ह स्टोरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या क्रूरतेमुळे प्रसिद्ध झालेल्या जर्मनीचा हुकूमशहा असलेल्या हिटलरचा 20 एप्रिल 1889 रोजी जन्म झाला. हिटलरचा जन्म ऑस्ट्रियामध्ये जरी झाला असला तरी त्याने जर्मनीवर राज्य केले. मात्र अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या हिटलरने रशियामध्ये झालेल्या पराभवानंतर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. याच्या काही तास आधीच त्याने आपली प्रेमिका असलेल्या इवा ब्राऊन सोबत लग्नही केले. याच्या काही तासांनंतरच त्याने स्वतःला गोळी मारून घेतली,

हिटलरला चित्रकलेची खूप आवड होती. यासाठी त्याने स्कूल ऑफ आर्ट्समध्ये देखील अर्ज केला होता मात्र त्यामध्ये तो अपयशी ठरला. यानंतरच त्याचा राजकारणातील वाढू लागला. यादरम्यान तो पोस्टकार्डवर चित्र काढून आपला उदरनिर्वाह करत होता. हा तोच काळ ज्यावेळी त्याच्या मनात ज्यू आणि समाजवादी लोकांविरोधात तेढ निर्माण झाली.

यावेळी जग पहिल्या महायुद्धात अडकले होते. हिटलर देखील सैन्यामध्ये भरती होऊन देशसेवेला हातभार लावत होता. या पहिला महायुद्धात जर्मनीला प्रभाव स्वीकारावा लागला. यानंतर हिटलरने सैन्याचा राजीनामा देत जर्मन वर्कर पार्टीचे सदस्यत्व घेतले. ही तीच पार्टी आहे जिला पुढे जाऊन नाझी पार्टी असे म्हंटले जाऊ लागले. हिटलरचे वक्तृत्व इतके अफाट होते कि त्याबळावर त्याने अनेक लोकांमध्ये आपला प्रभाव निर्माण केला. याकाळातच त्याला अनेक लोकांचा पाठिंबा देखील मिळू लागला.

यादरम्यानच त्याची ओळख एका मुलीशी झाली. तिच्या प्रेमात हिटलर अगदी आकंट बुडाला. ती एक ज्यू होती. यांची पहिली भेट म्युनिच मध्ये झाली होती. त्यावेळी हिटलरचे वय 40 होते, तर ती मुलगी 17 वर्षांची होती. त्यावेळी हिटलर कडे इतकाही वेळ नसायचा कि तो आपल्या मनातले गुपित तिला सांगू शकेल. ते 10 वर्षे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत राहिले. त्या मुलीचे नाव होते इवा ब्राऊन.

इवा म्युनिचमध्ये एका नाझी फोटोग्राफरकडे काम करत होती. त्यांची पहिल्यांदा भेट तिथेच झाले. त्यांनी कधीही आपल्या मनातली गोष्ट एकमेकांना सांगितली नाही. कारण कोणाला हे कळावे अशी हिटलरची अजिबात ईच्छा नव्हती. आपल्या विस्तारवादी भूमिकेमुळे पुढे जाऊन हिटलरने अनेक देशांवर आक्रमणे केली. यामुळेच दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. अनेक देश एकत्र येऊन जर्मनीला हरवण्यासाठी लढू लागले. पुढे 1945 मध्ये अमेरिका आणि रशियन सैन्याने हिटलरला पकडण्यासाठी जीवाची शिकस्त केली. यावेळी सुमारे एक महिना हिटलर आणि इवा एका बंकर मध्येच राहिले.

पुढे 29 एप्रिल 1945 ला हिटलर आणि इवाने लग्न केले. मात्र हे लग्न एकच दिवस टिकले. कारण एप्रिल 30 रोजी आपल्या स्टाफला भेटल्या नंतर त्याने आपल्या कुत्र्याला विष दिले. वास्तविक हिटलर स्वतः विष खाऊन आत्महत्या करणार होता. मात्र आधी त्याने ते कुत्र्याला दिले. कारण त्याला त्या विषाचा होणार परिणाम पाहायचा होता.

30 एप्रिलला दुपारी त्या दोघांनी जेवण केले आणि आपल्या खोलीत गेले. या दरम्यान त्यांच्या रूमच्या बाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांनी गोळ्यांचे आवाज ऐकले. अमेरिकन आणि रशियन सैन्य आपल्याला पकडणार… आता दुसरा कोणताही मार्ग नाही यामुळे इवाने सायनाईड खाल्ले. त्याचवेळी हिटलरनेही स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या.

आत्महत्या करण्याआधी हिटलरने कर्मचाऱ्यांना सांगितले होते कि, आपल्या डेड बॉडीला जाळून टाका. हिटलर ख्रिश्चन होता आणि ख्रिश्चनांमध्ये डेड बॉडीला गाडले जाते. मात्र हिटलरला भीती वाटत होती जर त्याला गाडले गेले तर पुन्हा खोदून त्याची बॉडी बाहेर काढली जाईल. त्यामुळे त्याने आपल्या कर्मचाऱ्यांना बॉडी जाळायचा आदेश दिला.

Leave a Comment