महाराष्ट्र पोलीस दलाला मोठा हादरा! आतापर्यंत १०० पोलिसांचा कोरोना संसर्गाने मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लॉकडाऊनमध्ये आघाडीवर राहून आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाची चिंता वाढवणारी बातमी आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तैनात असलेल्या पोलिसांनाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. राज्यात आतापर्यंत १०० पोलिसांचा कोरोनामुळं बळी गेल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात आतापर्यंत ९,०९६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ९३७ अधिकारी तर ८१५९ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील ७२२ अधिकाऱ्यांसह एकूण ७०८४ पोलीस करोनामुक्त झाले आहेत. तर, आतापर्यंत १०० पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यात आठ अधिकारी आणि ९२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यातील ठिकठिकाणच्या रुग्णालयांमध्ये एकूण १९१२ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. त्यात २०७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं पोलिसांवरील जबाबदारी प्रचंड वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्यासाठी लॉकडाऊन यशस्वीपणे राबवणं गरजेचं आहे. त्यासाठी गेल्या ४ महिन्यांपासून पोलीस आघाडीवर राहून कर्तव्य बजावत आहेत. लॉकडाऊनचे नियम नागरिकांकडून मोडले जाऊ नयेत म्हणून डोळ्यात तेल घालून काळजी घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment