औरंगाबाद | यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे गेल्या आठवड्याभरात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 100 मिमी एवढा पाऊस झाला आहे. त्याचबरोबर 9 टक्क्यांनी भर पडली असून 115 वरून 124.5 टक्के सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
यंदाच्या पावसामुळे आणि काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीस आलेले मूग, उडीद पिकांच्या शेंगातील दाणे भिजून कोंब देखील फुटत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्याचबरोबर शेतातील पीक कोमेजू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. परंतु 6 ऑगस्टपासून पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. आणि गेल्या आठवड्याभरात मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यांमध्ये 105 ते 155 मिमी जोरदार पाऊस झाला आहे.
1 जून ते 31 जुलै या कालावधीत मराठवाड्यात 145.5 टक्के विक्रमी पाऊस पडण्याची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात 93.5 मिमी एवढा पाऊस अपेक्षित होता. परंतु यावेळी फक्त 11.9 मिमी पाऊस पडला. यामुळे सरासरी टक्केवारी 30.2 ने घसरून 115.9 टक्क्यांवरून खाली येण्याची नोंद झाली होती. ‘यंदाचा पाऊस हा परिणामकारक नसून सतत हवामान बदलामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी होते तर काही ठिकाणी मध्यम प्रकारचा पाऊस होतो. म्हणूनच जलसाठ्यामध्ये वाढ झालेली नाही.’ असे हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले.