औरंगाबाद प्रतिनिधी । आज पासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापणे बंद ठेऊन 100 टक्के लॉक डाऊन करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घेतल्यानंतर शहरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला तर नेहमी गजबजलेले पेट्रोलपंप देखील ओस पडल्याचे चित्र आज सकाळ पासून पाहायला मिळाले.
औरंगाबाद शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा नऊशेच्या जवळ पोहोचला आहे. तरी देखील नागरिकांना मध्ये गांभीर्य दिसत नाही.किरकोळ कारणासाठी रस्त्यावर,बाजारात तोबा गर्दी होत आहे.परिणामी संक्रमनाचं धोका अधिक झाला आहे. ही चेन तोडण्यासाठी व संक्रमण रोखण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आता 15, 16 व 17 में अशे तीन दिवस औषधी आणि अत्यावश्यक सेवा वगळता 100 टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे पोलीस प्रशासनही कडक भूमिका घेणार असून आज शुक्रवार विषम तारीख आहे. त्यामुळे आज अत्यावश्यक सोडून सर्व बंद आहे.
नागरिकांनी अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किंवा भाजीपाला इतर वस्तूंच्या खरेदीसाठी कोणीही रस्त्यावर येणार नाही जर का कोणी रस्त्यावर विनाकारण फिरत असतील तर त्याची गाडी जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सर्व अधिकारी कर्मचारी रस्त्यावर राहणार आहेत. जर का कुणी असा माणूस रस्त्यावर आला तर त्याची गाडी जप्त केली जाईल त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सक्त आदेश दिले आल्याची माहिती सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी दिली.
काही भागावर विशेष लक्ष…
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून शहरातील काही भागातील नागरिक प्रशासनाच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत सर्रास घोळक्याने फिरत आहे.अशा भागाची यादी तयार करण्यात आली आहे.त्या भागामध्ये अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहे तर फिरते पथक देखील ठेवण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरातील पेट्रोलपंप पडले ओस….
शहरात मार्च महिन्यापासून लोकडाऊन करण्यात आले आहे तरी देखील पेट्रोलपंपवर गर्दी पाहायला मिळत होती.मात्र आज चित्र काही औरच होते. शहरातील अनेक पंप हे सकाळ पासून ओस पडले होते तर अनेक पंपा वर आज 10 वाजे पर्यंत बोहनी देखील झाली न्हवती असे पंप चालकांनी सांगितले.