75 रुपयांचे मोफत पेट्रोलसोबत 1000 रुपयांचा कॅशबॅक; भारत पेट्रोलियमची खास ऑफर

0
8
Bharat Petroleum Special Offer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशभरात वाढलेल्या महागाईने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. यामध्ये, पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किंमतींनी तर नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसला आहे. गेल्या वर्षभरात इंधनाचे दर सतत चढत असल्याने वाहनधारकांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत सरकारी तेल कंपनी भारत पेट्रोलियमने (BPCL) ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे.

या खास ऑफरनुसार, भारत पेट्रोलियमच्या या योजनेअंतर्गत ग्राहकांना ७५ रुपयांपर्यंतचे पेट्रोल मोफत मिळणार आहे. कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त ही ऑफर देण्यात येत आहे. ही योजना २८ फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी लवकरात लवकर याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.

अशी मिळेल मोफत पेट्रोलची संधी

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना काही सोप्या अटी पूर्ण कराव्या लागतील. भारत पेट्रोलियमच्या कोणत्याही अधिकृत पेट्रोल पंपावर जाऊन मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी लागेल. यानंतर ग्राहकांना MAK 4T इंजिन ऑइलचा एक पॅक खरेदी करावा लागेल. हे ऑइल खरेदी केल्यावर लगेचच ७५ रुपयांचे पेट्रोल मोफत दिले जाईल. याशिवाय, ग्राहकांना १००० रुपयांपर्यंत कॅशबॅक जिंकण्याची संधीही मिळणार आहे.

कॅशबॅकसाठी ग्राहकांना हे करावे लागेल

  1. पेट्रोल पंपावरून इंजिन ऑइल खरेदी केल्यानंतर ग्राहकांना एक क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.
  2. स्कॅनिंगनंतर त्यांना १००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळण्याची संधी मिळेल.
  3. ही ऑफर एका मोबाईल नंबरवर फक्त एकदाच लागू असेल.

कोणाला मिळणार नाही ऑफरचा लाभ?

ही ऑफर फक्त १८ वर्षांवरील ग्राहकांसाठीच लागू आहे. तसेच, भारत पेट्रोलियमचे कर्मचारी, डीलर्स, वितरक आणि त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेत सहभागी होता येणार नाही. काही राज्ये व केंद्रशासित प्रदेश जिथे अशा प्रकारच्या ऑफरवर निर्बंध आहेत, तिथेही ही योजना लागू होणार नाही. दरम्यान, राज्यात इंधनाच्या किमती वाढल्या असताना भारत पेट्रोलियमची ही ऑफर दुचाकीधारकांसाठी नक्कीच दिलासा देणारी ठरणार आहे. परंतु या खास ऑफरचा लाभ ग्राहकांना फक्त 28 फेब्रुवारीपर्यंत घेता येणार आहे.