हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL : आजकाल ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा सुरु आहे. याचा फायदा ग्राहकांना देखील होतो आहे. कारण यामुळे ग्राहकांसाठी अनेक चांगल्या रिचार्ज ऑफर्स उपलब्ध होत आहेत. ज्यामुळे ग्राहकांना देखील योग्य प्रीपेड प्लॅनची निवड करणे अवघड बनले आहे. हे लक्षात घ्या कि, सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडे आपल्या ग्राहकांसाठी अनेक स्वस्त प्लॅन्स आहेत, ज्यामध्ये ग्राहकांना कमी खर्चात अनेक फायदे दिले जात आहेत.
हे लक्षात घ्या कि, BSNL कडून ग्राहकांना या प्लॅनमध्ये 1000 GB डेटा दिला जात आहे. जर आपण खाजगी टेलिकॉम कंपन्यांबाबत चर्चा केली तर ते या किंमतीमध्ये डेली 2GB पेक्षा जास्त डेटा देत नाहीत. मात्र BSNL चे हे दोन्ही प्लॅन ब्रॉडबँडसाठी आहेत. यामधील पहिल्या प्लॅनची किंमत 329 रुपये तर दुसऱ्या प्लॅनची किंमत 399 रुपये आहे. चला तर मग या प्लॅन विषयी सविस्तरपणे जाणून घेउयात…
329 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
हे जाणून घ्या कि, हा एक एंट्री-लेव्हल ब्रॉडबँड प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना 1000GB डेटा दिला जात आहे. यामध्ये 20 Mbps स्पीड मिळेल. तसेच हे डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 2 Mbps पर्यंत खाली येईल. यासोबतच कंपनीकडून अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगही ऑफर करत आहे.
399 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
BSNL च्या या प्लॅनमध्ये यामध्ये ग्राहकांना 1000GB डेटा दिला जात आहे. यामध्ये 30 Mbps स्पीड मिळेल. तसेच डेटा लिमिट संपल्यानंतरइंटरनेट स्पीड 2 Mbps पर्यंत खाली येईल. यासोबतच कंपनीकडून ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील मिळत आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://portal.bsnl.in/myportal/quickrecharge.do
हे पण वाचा :
Interest Rates : ‘या’ चार बँका बचत खात्यावर देत आहेत सर्वाधिक व्याज, नवीन दर तपासा
PNB ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याज दर तपासा
नवीन बदल अन् फीचर्स सहित पुन्हा लाँच होणार Yamaha RX 100, कंपनीने दिले सूतोवाच
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 4 वर्षांत गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधी रुपयांचा नफा !!!
Train Cancelled : दिवाळीनंतरही रेल्वेकडून 116 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा