मिरज दंगल प्रकरणी मैनुद्दीन बागवानसह 106 जण निर्दोष

सांगली प्रतिनिधी  |  मिरजेत 2009 साली गणेशोत्सव काळात जातीय दंगली झाल्या होत्या. यामध्ये अनेकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये सरकारी कामात अडथळा, बेकायदे जमाव जमविणे, सरकारी मालमत्तेस नुकसान करणे आदि कलमांखाली अनेकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले होते.याच्या गुन्ह्यातील 106 जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी.पोळ यांनी निर्दोष मुक्तता केली. यामध्ये बजरंग पाटील, विकास सुर्यवंशी, सुनिता मोरे,मैनुद्दीन बागवान, अभिजीत हारगे यांचाही समावेश आहे. सरकारी वकील म्हणून ऍड.अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. ऍड.बिलकीस शेख-बुजरूक यांनीही काही आरोपींच्या केसेसचे काम पाहिले.

2009 साली झालेल्या दंगलीच्या गुन्ह्यातील सदर गुन्हेमधील काही कसेस निकाली झाल्या होत्या. त्यापैकी दोन केसेस जिल्हा सत्रन्यायालय सांगली येथे पेंडींग होते. सरद केसेसमध्ये सरकारतर्फे सदर केसेस निकाली काढण्यासाठी अर्ज आल्यानंतर आरोपींच्यातर्फे म्हणणे दाखल केले होते. दंगलीच्या गुन्हयातील 106 आरोपींना निर्दोष मुक्तता केली आहेत. मिरजेमध्ये ऐन गणेशोत्सव काळात जातीय दंगली घडल्या होत्या. यामध्ये राजकीय, सामाजिक तसेच संघटनेचे पदाधिकारी व नेते अशा अनेकांवर विविध कलमांनुसार फौजदारी स्वरूपाची गुन्हे दाखल केले होते.

प्रामुख्याने सुरेशभाऊ खाडे, चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता. 2017 साली सुरेशभाऊ खाडे व चंद्रकांत पाटील हे दंगलीच्या गुन्ह्यातून निर्दोष झाले आहेत. कागदपत्रांच्या आणि रेकॉर्डवरील पुराव्यांच्या आधारे दोषी ठरवण्याची शक्यता नाही. तसेच पूर्वीचा कोणताही जातीय दंगल झाला नव्हता. त्यामुळे फिर्यादीने खटला मागे घेण्याची आणि आरोपी व्यक्तींची सुटका करण्याची म्हणणे मांडले.