औरंगाबाद : दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत होणार आहे. बारावीची परीक्षा लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार. कोरोनामुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा महाविद्यालयात देण्याची सोय केली जाईल, तसेच परीक्षेसाठी वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेत परीक्षा देण्याची सोय केली जाईल.
८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी आता तीन तासांऐवजी साडेतीन तास मिळणार तर ४० ते ५० गुणांसाठी १५ मिनिटांचा वाढीव वेळ मिळणार आहे. दिव्यांग मुलांना २० मिनिटे अधिक मिळणार. प्रात्यक्षिक परीक्षा कोरोनामुळे विशिष्ट लेखन कार्य, गृहपाठ पध्दतीने होतील.
प्रात्यक्षिक परीक्षा १२ वीच्या लेखी परीक्षेनंतर २२ मे ते १० जून या काळात होईल. पाच ते सहा प्रात्यक्षिकावरच परीक्षा होईल, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याचा निर्णय घ्यावा. कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेनंतर १५ दिवसांत गृहपाठ सादर करावा.
परीक्षार्थी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला कोरोनाची लागण झाल्यास त्यांची परीक्षा स्वतंत्रपणे होईल. परीक्षा मंडळामार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होईल; त्यासाठी परीक्षा केंद्रे शहरी भागात व तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी होणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा