ब्रेकिंग! दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या वाढता फैलाव लक्षात घेता सोमवारी होणार दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रालयानं यासंदर्भात माहिती दिली आहे. करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी दहावीचा शेवटच्या पेपर संदर्भात आता ३१ मार्चनंतरच निर्णय घेणार असल्याचंही शालेय शिक्षण मंत्र्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

याआधी दहावीचे उरलेले पेपर मात्र वेळापत्रकानुसारच होतील, असं राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होत. मात्र, राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आता शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याआधी पहिली ते आठवी इयत्तेच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आहे. तसेच नववी व अकरावीचे उर्वरित पेपर १५ एप्रिलनंतर होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दहावीचे शिक्षक सोडून इतर सर्व शिक्षकांनी घरूनच काम करावे, अशा सूचनाही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment