११ जून १९७५ याच दिवशी भारताने नोंदवला विश्वचषकातील आपला विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने एकूण तीन वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. १९८३ साली भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज चा पराभव करून वन डे विश्वचषक पटकावला होता. तर त्यानंतर भारताने २००७ साली टी २० विश्वचषक आणि २०११ साली आपल्या दुसऱ्या वन डे विश्वचषकावर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली नाव कोरले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हे तीनही दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहेत. मात्र त्याचवेळी ११ जून १९७५ या दिवसाला भारतीय क्रिकेटमध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Srinivas Venkataraghavan - 1975 and 1979

पहिल्यावहिल्या क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन १९७५ मध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेआधी १९७४ मध्ये भारताने इंग्लंडविरुद्द दोन वन डे सामने खेळले होते, ज्यात भारताचा पराभव झाला होता. भारताने त्यावेळी श्रीनिवासराघवन व्यंकटराघवन यांच्या नेतृत्वाखाली या विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळीच्या स्पर्धेत एकूण आठ संघ होते. १९७५ च्या या विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडने भारताचा २०२ धावांनी दणदणीत पराभव केला. मात्र त्यानंतर झालेल्या पूर्व आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने जोरदार मुसंडी मारताना वन डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील आपला पहिला विजय नोंदविला होता. ती तारीख होती ११ जून १९७५…

१९७५ च्या विश्वचषक स्पर्धेत वन डे सामने हे ६०-६० षटकांचे खेळवले गेले तसेच प्रत्येक संघाच्या गोलंदाजांना १२-१२ षटके टाकण्याची परवानगी होती. पूर्व आफ्रिकेने भारताविरूद्धच्या सामन्यात या नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतासाठी वेगवान गोलंदाज मदन लाल आणि सय्यद अबिद अली यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.

India At The 1975 World Cup - When Players Went on a Holiday

त्या काळातील भारतीय संघातील स्टार फिरकी गोलंदाज बिशन सिंग बेदी यानेही जोरदार कामगिरी करत आफ्रिकन फलंदाजांना धावा करण्याची फारशी संधीच दिली नाही. बेदीने आपल्या १२ षटकांमध्ये केवळ ६ धावा दिल्या आणि एक बळी टिपला. त्याने ८ षटके निर्धाव टाकली. त्यामुळे पूर्व आफ्रिकेचा संघ हा केवळ १२० धावांवरच तंबूत परतला. १२१ धावांच्याया लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला सुनील गावस्कर आणि फारूक इंजिनिअर या सलामीवीरांनी ३० व्या षटकातच विजय मिळवून दिला आणि हा सामना १० गडी राखून जिंकवून दिला. या सामन्यात गावसकरने नाबाद ६५ तर फारूक इंजिनियरने नाबाद ५४ धावा फटकावल्या होत्या.

June 7, 1975: Gavaskar's 174-ball 36* in first ever World Cup ...

या स्पर्धेततील तिसर्‍या सामन्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. या पुढेही भारतीय संघ स्पर्धेत काही खास कामगिरी करू शकला नाही आणि विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला. या विश्वचषकातील अंतिम सामना हा इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये खेळला गेला. त्या अंतिम सामन्यात इंग्लंडला १७ धावांनी पराभूत करत वेस्ट इंडिजने हा पहिलावहिला विश्वचषक जिंकला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment