अहमदाबाद : वृत्तसंस्था – गुजरात दंगलीतील बिल्किस बानो बलात्कार प्रकरणी (Bilkis Bano Rape Case) मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात (Bilkis Bano Rape Case) जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या 11 दोषींची सुटका करण्यात आली आहे. गुजरातमध्ये 2002 मध्ये गोध्रा दंगल झाली होती. 3 मार्च 2002 मध्ये दाहोद जिल्ह्यातील रंधिकपूर गावात बिलकिस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार (Bilkis Bano Rape Case) झाला होता. तर, त्यांच्या कुटुंबातील सात लोकांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना 2004 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांची आता गुजरात सरकारकडून सुटका करण्यात आली आहे.
राधेश्याम शाही, जसवंत चतुरभाई नाई, केशुभाई वदानिया, बकाभाई वदानिया, राजीवभाई सोनी, रमेशभाई चौहान, शैलेशभाई भट्ट, बिपिन चंद्र जोशी, गोविंदभाई नाई, मितेश भट्ट आणि प्रदीप मोढिया अशी या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने 21 जानेवारी 2008 रोजी बिल्कीस बानो बलात्कार (Bilkis Bano Rape Case) प्रकरणात या 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या सर्वांवर सामूहिक बलात्कार आणि बिलकिस बानो यांच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केल्याचा आरोप होता.
या आरोपींनी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर 18 वर्षे तुरुंगवास भोगला. यानंतर त्यांच्यातील एका कैद्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत (Bilkis Bano Rape Case) मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका दाखल केली. यावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून त्यांना माफ करता येईल का, हे पाहण्याचे निर्देश गुजरात सरकारला दिले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुजरात सरकारने एक समिती स्थापन केली. या समितीने सर्व 11 आरोपींना माफी देण्याचा एकमताने निर्णय घेतला. यानंतर राज्य सरकारला याची माहिती देऊन या सर्वांना तुरुंगातून सोडण्याचे आदेश जारी करण्यात आले.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?