पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस; अप्पर वर्धा धरणाचे १३ पैकी ११ दरवाजे उघडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती । पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मागील दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील आणि मध्यप्रदेशमधील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं नद्यांना पूर आले आहे. दरम्यान, पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा पाणी साठवणूक प्रकल्प असलेल्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे १३ पैकी ११ दरवाजे ३५ सेंटी मीटरनी आज पहाटे उघडण्यात आले. या धरणातून सध्या ६२० घनमीटर प्रति सेंकद एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यावर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने अमरावती शहरास इतर भागातील लोकांचा व शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटला आहे.

मागील दोन दिवसापासून पावसाच्या संततधारेमुळे अप्पर वर्धा धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळं धरणाचा काल सायंकाळी १ दरवाजा उघडण्यात आला होता. परंतु मध्यरात्री धरण क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील जलाश्याची पातळी ही ९५.१६% इतकी झाल्याने पुन्हा १० दरवाजे उघडण्याचा निर्णय हा धरण प्रशासाने घेतला.

मागील वर्षीच्या उन्हाळ्यात अखेरीस या धरणाचा जलसाठा हा ११% पर्यत येऊन पोहचला होता.परन्तु मागील वर्षी झालेल्या दमदार पावसाने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते.यंदा सुद्धा धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने हा प्रकल्प भरला आहे. त्यामुळे आता अमरावती शहर, वरुड, मोर्शी, आष्टी, सह आदी गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. रब्बी हंगामातील शेतीसाठी सुद्धा या धरणांतील पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना होतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment