11 वर्षीय मुलगा युट्युबवर शिकला हॅकिंग ; बापालाच मागितली तब्बल 11 कोटींची खंडणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका अकरा वर्षीय मुलांने हॅकिंगचे तंत्र यु ट्यूब वरती शिकवून घेतले. आणि स्वतःच्या बापाचा मोबाईल आणि ई-मेल हॅक करून बापालाच खंडणी मागितली. असे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. खंडणी मागताना मुलाने बापाला बजावून ठेवले होते की, वेळेत रक्कम आली नाही तर अश्लील फोटो आणि कौटुंबिक माहिती इंटरनेटवर टाकली जाईल.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, या प्रकरणाची एका व्यक्तीने पोलिस तक्रार दाखल केल्यानंतर, गाझियाबादमधील हे प्रकरण उघडकीस आले. संबंधित व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दिली होती. या तक्रारीमध्ये, काही गुंड त्याला वारंवार घांडणीसाठी मागणी करत आहेत. काही आक्षेपार्ह फोटीज आणि कुटुंबाची वैयक्तिक माहिती इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत आहेत. अशी नोंद केली होती.

पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतल्यानंतर, ज्या ‘आयपी ॲड्रेस’च्या वरून ईमेल आले होते त्याचा शोध घेतला. शोध घेतल्यानंतर ते व्यक्तीच्या घरातूनच मेल पाठवल्याचे निष्पन्न झाले. घरातील व्यक्तीची कसून चौकशी केल्यानंतर, अकरा वर्षीय अल्पवयीन मुलाने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्याच्या कबुलीनंतर अल्पवयीन मुलावर भारतीय दंड संहितानुसार गुन्हेगारी इच्छा, महिलांचा अनादर, शांती भंग करणे आणि आयटी ॲक्ट सेक्शन 66 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment