12-15-20 Investment Formula | समजून घ्या गुंतवणुकीचा 12-15-20 फॉर्मुला, 40 व्या वर्षी व्हाल कोट्यवधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

12-15-20 Investment Formula | आपल्याला भविष्यात चांगल्या आयुष्य जगता यावे, सगळ्या सुखसुविधा मेळाव्यात यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. आणि यासाठी तुमच्याकडे एक मोठा फंड असणे आवश्यक असते. आणि त्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करावी लागते, तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक करणे सुरू कराल. तितक्या लवकर तुम्हाला त्याचा खूप चांगला परतावा मिळेल.

परंतु त्यासाठी चांगल्या स्कीम निवडणूक देखील तितकंच महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळा आपण चुकीच्या योजना निवडतो आणि चुकीच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने आपल्याला त्याचा तोटा होतो. परंतु आपल्याला कमीत कमी वयामध्ये काही खास स्कीम आणि त्याच्या फॉर्मुला जाणून घेणे, खूप गरजेचे असते. तेव्हाच तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी खूप चांगला परतावा मिळू शकतात.

आता कोट्यधीश होणे यासाठी कोणत्याही प्रकारचं जास्त कष्ट घ्यावे लागत नाही. यासाठी तुम्हाला योग्य गुंतवणूक धोरणाचा अवलंब करावा लागतो. यात तुम्हाला 12- 15-20 हा फॉर्म्युला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

यामध्ये 12 टक्के परतावा, 15 म्हणजे 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. आणि 20 म्हणजे 20 हजार रुपये मासिक गुंतवावे लागतील. याप्रमाणे तुम्ही जर वयाच्या 25 व्या वर्षापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर चाळीसाव्या वर्षापर्यंत तुम्ही कोट्यावधी व्हाल.

कुठे कराल गुंतवणूक?

आता अनेकांना प्रश्न पडतो की गुंतवणूक नेमकी कुठे करायची? ज्यातून १२ टक्के परतावा मिळेल. याचे उत्तर म्हणजे एसआयपी तुम्ही करू शकता. परंतु तज्ञांच्या मते या दीर्घकाळ सरासरी किमान 12 टक्क्यांचा परतावा मिळतो. तर कधी कधी यापेक्षाही जास्त असू शकतो.

तुम्ही कोट्यावधी कसे बनाल ? | 12-15-20 Investment Formula

तुम्ही एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात दर महिन्याला 20 हजार रुपये जर जमा केले, तर 15 वर्षात एकूण 3 लाख 60 हजार रुपये गुंतवाल. एसआयपी कॅल्क्युलेशनद्वारे तुम्हाला 12 टक्के व्याज दराने 64 लाख 91 हजार 520 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे 15 वर्षानंतर तुम्हाला 1 कोटी 91 लाख 520 रुपये मिळतील.

20 हजार रुपये दर महिन्याला कसे गुंतवाल ?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, दर महिन्याला 20 हजार रुपये उपलब्ध कसे करायचे? जर तुमचा पगार 60 ते 70 हजार दरम्यान असेल, तर 20 हजार रुपये तुम्ही सहज काढू शकता. आर्थिक नियम असे सांगतात की व्यक्तीने त्यांच्या कमाईतील 30 टक्के रक्कमेची हे गुंतवणूक केली पाहिजे म्हणजे दर महिन्याला 65 हजार रुपये असतील तर त्यातील 30 टक्के म्हणजे 19 हजार 500 रुपये म्हणजे जवळपास 20 हजार रुपये तुम्ही गुंतवणूक करू शकता. अशाप्रकारे जर तुम्ही दर महिन्याला 20 हजार रुपये जमा केले तर 15 वर्षानंतर तुम्ही कोट्यावधीचे मालक असाल.