सामुहिक नमाज पठण प्रकरणी कराडात कारवाई, प्रत्तेकी १२ हजार रुपये दंड वसूल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमात उपस्थित असणार्‍या नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोनाचा अनेकांना फैलाव झाल्याचे आता समोर आले आहे. यामुळे सामुहिक नमाज पठणावर सरकारने निर्बंध आणले आहेत. मात्र सरकारच्या सुचनांकडे दुर्लक्ष करत सामुहिक नमाज पठण करणार्‍या कराडातील १२ नागरिकांवर कराड पोलिसांनी कारवाई केली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, शहरातील सर्वभागात संचारबंदीचे काटेकोरोपणे पालन होत असताना १२ नागरिकांनी सामुहिक नमाज पठण करत त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. एकाच्या घरात जमून हे १२ जण सामुहिक नमाज पठण करत असताना कराड पोलिसांनी त्यांना पकडले. शासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष करत कलम १४४ तोडल्याप्रकरणी सदर नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शिक्षा म्हणुन प्रत्तेकी १२  हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. शहरात काल कोरोनाचा तालुक्यातील पहिला रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण आहे. अशात प्रशासनाकडून सर्व योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

कोविड -१९ च्या लसीची उंदीरांवर यशस्वी चाचणी; जाणून घ्या

लॉकडाउन उठवण्यापेक्षा केंद्र सरकार घेऊ शकते ‘हा’ निर्णय

६ CRPF जवानांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह

Leave a Comment