वर्षभरात औरंगाबादेत 12 सीएनजी पंप होणार सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वतीने औरंगाबाद शहरात आणखी 12 सीएनजी पंप सुरू केले जाणार आहेत. नगर-औरंगाबाद या इंधन पाईपलाईन मधूनच इंडियन ऑइल पुरवठा केला जाणार आहे. पंपाच्या उभारणीस वर्षभराचा कालावधी लागणार आहे.

दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची समस्या आता सुटली असून मराठवाड्यातील पहिल्या व्हेईकल चार्जिंग स्टेशनला गुरुवारी प्रारंभ झाला आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाअंतर्गत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन महाराष्ट्र व गोव्यातील पहिला आदर्श पेट्रोल पंप म्हणून दक्षता पेट्रोल पंपची घोषणा केली.

कंपनीचे व्यवस्थापक अजय कुमार श्रीवास्तव म्हणाले, भारत गॅस रिसोर्स लिमिटेडने शहर सीएनजी पाईपलाईन टाकण्यास सुरुवात केली आहे. इंडियन ऑइल या यंत्रणेचा वापर करून 12 पंपावर सीएनजी पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच पंप सुरू होतील. सीएनजी लाईन सुरु झाल्यावर नवे प्रस्ताव मागवले जातील असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment