राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणार, ‘या’ जिल्ह्यातून होणार सुरुवात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात आला होता. यानंतर शिरसाट यांनी आपण कुणाच्याही संपर्कात नसून शिंदे गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केले. यादरम्यान शिंदे गटाचे नेते, आमदार शहाजी बापू पाटील (shahaji bapu patil) एक मोठे वक्तव्य केले. राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणार आहे आणि ही फुटीची सुरुवात सोलापुरातून होणार आहे, असा गौप्यस्फोट शहाजी बापू पाटील (shahaji bapu patil) यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

काय म्हणाले शहाजी बापू पाटील?
शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात यासाठी बोललं जातंय कारण राष्ट्रवादीतील 12 नेते फुटलेले आहेत. पण ज्याचा त्याचा मुहूर्त ठरायचा आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोठ्यातील मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीला दणका बसणार आहे. सोलापुरातील हा नेता फुटणार आहे. जरा थांबा. ठरवून सगळं शिजवून झालेलं आहे. फक्त झाकण उघडायचे आणि वाढायचे आहे, असा दावा शहाजी बापू पाटील पाटलांकडून (shahaji bapu patil) करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नेते, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. सत्तेवर आल्यावर पक्षाच्या अनेक नेत्यांना आमिषे दाखविली जात आहेत. त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. जे पक्ष सोडून गेले ते आज अस्वस्थ आहेत तसे ते बोलून दाखवत आहेत, असे अजित पवार म्हणाले आहेत.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी