12 Th Board Exam Rules | आता काही दिवसातच दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा चालू होणार आहे. त्यात 21 फेब्रुवारीपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. आता यावर्षी या बोर्डाच्या परीक्षेसाठी अनेक नियम लागू करण्यात आलेले आहेत. त्यातील पहिला नियम म्हणजे आता विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे आहे. पेपर सुरू झाल्यानंतर जर एखादा विद्यार्थी आला. तर त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देणार नाही. अशी सूचना प्रत्येक केंद्रांना देण्यात आलेले आहेत.
यावर्षी बोर्डाने कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे एकाच शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षेच्यासाठी एकामागे एक बसणार नाही. त्यांचे परीक्षा क्रमांक हे वेगवेगळ्या केंद्रावर असतील. विद्यार्थ्यांनाही परीक्षा चालू होण्याआधी दहा मिनिटे अगोदरच प्रश्नपत्रिका दिली जायची. परंतु आता ही पद्धत बंद करणार आहे. आणि पेपरसाठी दहा मिनिटे वाढून वेळ दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्राच्या जवळपास 100 मीटर अंतरावर सर्व झेरॉक्स दुकाने, संगणक क्लास पेपर होईपर्यंत बंद राहण्याच्या आदेश दिलेले आहेत. त्याशिवाय भाषा आणि इतर विषयांच्या पेपर साठी विद्यार्थ्यांना अभ्यास करायला मिळेल इतका वेळ दिलेला आहे.
महत्वाची माहिती | 12 Th Board Exam Rules
- यावर्षी इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा ही 21 फेब्रुवारी 23 मार्च पर्यंत होणार आहे.
- इयत्ता दहावीची परीक्षा 1 मार्च ते 23 मार्च पर्यंत होणार आहे.
- सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहिले तर दहावीसाठी 182 व बारावी साठी 118 केंद्र आहेत.
- या ठिकाणी दहावीचे 65 हजार 749 विद्यार्थी तर बारावीतील 52 हजार 880 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
बारावीची परीक्षा काही दिवसातच चालू होणार आहे त. यामुळे उत्तर पत्रिका ह्या परीक्षा केंद्रावर ती आधीच पोहोचले आहेत. आणि प्रश्नपत्रिका या परीक्षेच्या आदल्या दिवशी पोहोच होणार आहेत. एकाच गाडीत दोन-तीन तालुक्यांच्या प्रश्नपत्रिका दिल्या जात होत्या. त्यामुळे रात्री खूप उशीर व्हायचा. परंतु यावर्षी बोर्डाने सोलापूर जिल्ह्यातील 14 कस्टडीसाठी वेगवेगळ्या वाहनांची व्यवस्था केली असता आहे. आणि रात्री सात ते आठ वाजेपर्यंत प्रश्नपत्रिका केंद्रावर पोहोचतील अशी व्यवस्था केलेली आहे.
परीक्षा केंद्रापासून 100 मीटर अंतरावर निर्बंध
परीक्षा केंद्राच्या जवळपास 100 मीटर परिसरात असलेली सगळी झेरॉक्सची दुकाने, इंटरनेट मोबाईल लॅपटॉप प्रसार माध्यमे अथवा इतर संपर्क साधनांच्या वापरण्यास बंदी घातलेली आहे . परंतु असे आढळले तर त्यावर निबंध घालण्यात येणार असल्याची माहिती बोर्डाने दिलेली आहे.